हर घर तिरंगा मोहीमेप्रमाणे हर घर वर्तमानपत्र मोहीम आवश्यक

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
_भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण झाले असुन,स्वातंत्र्यपुर्व काळापासून ते आजपर्यंत वृत्तपत्र तसेच पत्रकार,वृत्तपत्रविक्रेता देशहीत,समाजहीत जोपासत आपल्या सर्वांच्या सेवेस अहोरात्र समर्पितआहे 15ऑगस्ट2022ला स्वातंत्रतेची75वर्षे पुर्ण झाल्याने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हर घर तिरंगा लावुन संपूर्ण देश भर आनंदाने साजरा करण्यात आला आहे.स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वृत्तपत्राचा महत्वाचा वाटा असल्याने,अमृतमहोत्सवी वर्षापासून हर घर तिरंगा मोहीमेप्रमाणे हर घर वर्तमानपत्राची मोहीम राबवणे गरजे चे असल्याचे दिसून येते आहे. यासंदर्भात वृत्तपत्राच्या माध्यमातूनच प्रामुख्याने जागतिक घडामोडीची माहिती व त्यातील परिपूर्णता,विष याची सत्यता,वैचारीक स्वातंत्र,शैक्षणीक तथा सामाजीक उत्क्रांती,राजकीयडावपेच,विषयाची सत्यता,पर्यावरणाती ल बदल,आरोग्यविषयक तसेच शालेय अभ्यासक्र याबाब तची माहिती आपणासं मिळते.यामुळे शालेयविद्यार्थी हा महत्वाचा घटक असल्याने,विद्यार्थीवर्गास वृत्तपत्र वाचना संबधी पालकांनी आपल्यापाल्यासं तसेच प्राथमीक,माध्य मिक,उच्चमाध्यमिक विद्यालयातील सर्वशिक्षकांनी,प्राध्या पकांनी आपल्या विद्यार्थ्यांना किमान एक इंग्रजी व एक आपल्या मातृभाषेतील एक वर्तमानपत्र दैनंदिन घरी तसे च विद्यालयात वाचण्यासाठी प्रवृत्त करावे. स्वातंत्रोत्तर काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परंपरा वर्तमानपत्रानीच यशस्वीरित्या टिकवून ठेवण्याचे काम के ले आहे.हर घर तिरंगा मोहीमेसारखे हर घर वर्तमानपत्र हे ज्यावेळी घडेल त्यावेळीची प्रामुख्याने एक सशक्त समाज व लोकशाही अस्तित्वात आली असल्याचे म्हणता येईल. विद्यार्थ्यांना सर्वपालकांनी आपल्या घरी किमान एक वर्त मानपत्र घेऊन आपल्या पाल्यास वाचणास प्रवृत्त करता ना,शाालेय साहीत्य,मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तुंब रोबर वर्तमान पत्राचे सानिध्य किती महत्त्वाचे आहे,याबा बात लहानपणापासुन मुलांंना समजावणे गरजेचे आहे.
अहमदनगर जिल्ह्यात नेवासे तालुका तसेच इतरत्र हर घर वर्तमानपत्र संंबधित मोहीम राबविण्यात येताना वर्तमानपत्र,पत्रकार बांधव व वृत्तपत्रविक्रतेंकडुन शालेय विद्यार्थ्यांचे पालक,मुखयाधयापक,शिक्षक,प्राध्यापक यांना यासंदर्भात माहीती व मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या विद्यालयात स्वतः,तसेच विद्यार्थ्यांसाठी या अमृतमहोत्सवी वर्षापासून कायमचं वृत्तपत्र खरेदी करून वाचनाची चांगली सवय विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यास प्रोत्साहीत करावे.तसेच यापुढे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापासुन हर घर वर्तमानपत्र हे अभियान आपल्या सर्वाच्या सहकार्यातुन राबविण्यात येऊन यशस्वी करावे. असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे