प्रहारच्या वतीने शनि मारूती मंदिरास अर्थिक मदत!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्ष शेवगाव तालुक्याच्यावतीने शनि मारुती मंदिरास ११००० रु देणगी दि २१ / ०३ /२०२२ शेवगाव येथील मुख्य पेठेतील जुन्या शनी मारुती मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम चालू असून आज प्रहार जनशक्ती पक्ष शेवगाव यांच्या वतीने डॉ दादासाहेब काकडे पा.(जिल्हा सल्लागार )यांच्या सहकार्याने श्री तुकाराम शिंगटे (जिल्हा संघटक ) रामजी शिदोरे (तालुका अध्यक्ष) राजेंद्र डोळे (तालुका उपाध्यक्ष ) जे.टी.पवार (तालुका कार्याध्यक्ष),सौ तारामती ताई दिवटे (महिला आघाडी शेवगाव अध्यक्ष) राजेश लोढे (दहिगाव ने भातकूडगाव गट अध्यक्ष) रामचंद्र गिरम (दहिगाव गण प्रमुख) विठ्ठलजी सांगळे, सुभाष काळे, लिंबोरे ताई यांचे वतीने शनी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष डॉ. नीरज लांडे,आणि डॉ. देहाडराय यांना ११००० रु चेक स्वरूपात प्रदान करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप, हरिभाऊ काळे,जयेश पटेल इत्यादी कार्यकर्ते आणि शेवगाव तालुका सर्व प्रहार पदाधिकारी,सदस्य उपस्थीत होते.आज पर्यंत शेवगाव तालुक्याच्या कोणत्याही सामाजिक कार्यात प्रहार सेवक अग्रेसर राहिले आहेत आणि राहणार आहोत,एक सामाजिक दायित्व म्हणून देणगी देण्यात येत आहे,श्री शनी मारोती मंदिर बांधकाम समितीच्या वतीने सर्व प्रहार सेवकांचे स्वागत करण्यात आले.