पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ,जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख उद्या अकोल्यात

अकोले प्रतिनिधी
राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना गुलाबराव पाटील व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख हे उद्या मंगळवार दि २४ मे २०२२ रोजी अकोले तालुका दौऱ्यावर येत आहे
म्हाळादेवी( ता अकोले )येथे सकाळी १० वाजता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व सरपंच प्रदीप हासे यांचा कार्यगौरव व अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत
जेष्ठ नेते व अगस्ती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सीताराम पाटील गायकर यांच्या आद्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास
नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत गोडसे,, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, ,
पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे
आमदार डॉ किरण लहामटे,
शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे माजी आमदार आ. वैभवराव पिचड
अशोकराव भांगरे , मच्छिंद्र धुमाळ ,शिवसेना जेष्ठ नेते मधुकरराव तळपाडेआदी मान्यवर उपस्थित राहणार आहे
–
—