इतर

अकोले तालुक्यातील कोकणे यांनी सोडला शिधापत्रिकावरील अन्नधान्याचा हक्क .

अकोले प्रतिनिधी

शासन निर्णय दि. 19 ऑक्टोबर 2016 नुसार राबविल्या जाणाऱ्या “अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा” (Opt out of Subsidy) या योजनेअंतर्गत आज दि. 25 ऑगस्ट 2022 रोजी मौजे कोतुळ ता.अकोले येथील लाभार्थी श्री. रामनाथ बाजीराव कोकणे यांनी शिधापत्रिकेवरील अन्नधान्याचा हक्क स्वेच्छेने सोडला

त्यांनी शिधापत्रिकावर देय अन्नधान्याचा हक्क तहसीलदार अकोले यांचेकडे अर्ज करून स्वेच्छेने सोडून दिला आहे. परिणामी अन्य गरजू लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळू शकणार आहे.

ज्या लाभार्थ्यांना अन्नधान्याची आवश्यकता नाही, त्यांनी आपला अन्नधान्याचा हक्क सोडल्यास त्यामुळे रिक्त होणारा इष्टांक गरीब, गरजू व पात्र लोकांसाठी वापरता येईल, त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांनी स्वतः हुन अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा असा अर्ज भरून देण्याचे आवाहन अकोल्याचे तहसीलदार श्री. सतीश थेटे यांनी केले आहे.

अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा” या योजनेचे फॉर्म सर्व स्वस्त धान्य दुकाने, तलाठी कार्यालय, आणि पुरवठा विभाग, तहसील कार्यालय अकोले येथे उपलब्ध आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button