पारनेर तालुक्यातील कान्हुरपठार येथील बैल पोळा व गौराई यात्रेची सांगता

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी.
. राज्यात प्रसिद्ध असलेल्या कान्हुरपठार (ता. पारनेर )येथील बैल पोळा व गौराई यात्रेची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दोन दिवस चाललेल्या या यात्रा उत्साहात हजारो आबाल वृद्धांनी हजेरी लावली. यात्रेच्या पहिल्या दिवशी सुभाष पाटील ठुबे, बाळासाहेब ठुबे, सुधीर ठुबे यांच्या मानाच्या बैलांची मिरवणूक वाजत गाजत गावात येऊन त्यांनी देवदर्शन घेतले व नंतर गावातील शेतकऱ्यांनी सजवलेली सर्जा- राजाची बैलजोडी गावातील मुख्य चौकात आणली व ख-याने पोळ्याला सुरवात झाली. फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची बेलभंडाराची मुक्त उधळण पारंपारिक व डी. जे वाद्ये न्रत्यगंनाचे बेधुंद नाचकाम यांच्या तालावर ठेका धरत हजारो तरुण बेधुंद पणे नाचत होते. यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक ,बीड जिल्ह्यातुन खास पोळा पहाण्यासाठी आलेल्या नागरीकांसह हजारो ग्रामस्थांनी मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गौराई यात्रेस प्रारंभ होतो .दुपारी मुख्य आकर्षण असलेल्या कुस्त्यांच्या अखाड्यास सुरवात होताच आखाड्यात राज्यातील नामांकित मल्लांनी हजेरी लावली . कुस्तीचा हा थरार पाहण्यासाठी हजारो ग्रामस्थ नांमाकीत पैलवान व कुस्ती प्रेमींनी आखाड्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अँड आझाद ठुबे, शिवसेना (शिन्दे गट) तालुका प्रमुख विकास रोहकले, बांधकाम समीतीचे मा. अध्यक्ष बाबासाहेब तांबे, नगरसेवक युवराज पठारे, आयुब हवलदार, सरपंच गोकुळमामा काकडे, उपसरपंच सागर व्यवहारे, सैनिक बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, डॉ. राजेंद्र ठुबे, कांतीलाल साळवे, शमशुद्दीन इनामदार, आर जी. ठुबे, आब्बास मुजावर, बी.एल ठुबे, शिवाजी शेळके,रमेश सोनावळे, किरण ठुबे, अंकुश ठुबे, ज्ञानेश्वर पाटील, नंदकुमार ठुबे, संतोष ठुबे, विजय काकडे, जयराम ठुबे, बापु चत्तर, बाबा घोडके, बाबासाहेब गुमटकर, किशोर शिन्दे, डी.एस ठुबे, दादाभाऊ ठुबे, पांडुरंग ठुबे, पोपट नवले, सचीन पाटील ाशोक पाटील, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
आखाड्याच्या सुरवातीला लहान मुलांच्या कुस्त्या झाल्या .त्या नंतर नामावंत मल्लांच्या हजारो रूपये बक्षीस असलेल्या निकाली कुस्त्यांचा थरार आखाड्यात बघावयास मिळाला. तर शेवटच्या कुस्ती साठी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांकडुन एक लाख एक हजार एकशे १११रुपयांची कुस्ती झाली. दरम्यानच्या काळात दुपारी दोन वा. महिलांचे आकर्षक असलेल्या आणि लताबाई सुभाष ठुबे व इतर महिलांचा मान असलेल्या गौराई देवीची गावातुन वाजत गाजत मिरवणूक निघाली .या मिरवणुकीत हजारो महिलांनी फेर धरून देवीचे गाणे गाईले सायंकाळी गौराई देवीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले .यात्रेच्या सुरक्षितेसाठी पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक जावळे, आनिल देवकर, पो. काँ.राम मोरे, पो.काँ .यादव, पो.काँ. पवार, ए. पी सी गोरे, यांनी योग्य नियोजन करुन बंदोबस्त ठेवला.