इतर
राज्यातील शिवसेना -संभाजी ब्रिगेडची युती फायदेशीर ठरणार –रावसाहेब लांडे

सोनई–[ विजय खंडागळे ] राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने भाजप प्रणित सरकार स्थापन झाले,त्यानंतर राजकीय उलथापालथ पाहता सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हाती झेंडा घेतला,परंतु भाजप पक्षाच्या वतीने चालू असलेल्या ईडीचौकशी,घोडेबाजार, भ्रष्टाचार उघड करणे,आदी भानगडी विरोधी पक्षाच्या आमदार- खासदार वर केली जात आहे,- त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यात एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी ही युती फायदेशीर ठरेल, असे मत लांडेवाडी येथील मुळा सहकारी साखर कारखाना माजी संचालक रावसाहेब लांडे यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ना त्या कारणाने प्रत्येक ठिकाणी सेवा कर लागू करून वसुलीचा सपाटा लावला आहे, सर्वसामान्य माणसाला जीवन जगणे मुश्कील बनले आहे,लोकशाही व संविधानाचा घात केल्याचा आरोप लांडे यांनी केला आहे. - हा सर्व प्रकार जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, खोके घेऊन बोके होणारे यापुढे निवडून येणार नाही,पेट्रोल,डिझेल,गॅस,च्या किमती दुप्पट करून कराच्या रूपाने मोठी वसुली करून या पैशातून आसाम, गोवा,बिहार,कर्नाटक,महाराष्ट्र, मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या राज्यातील सरकार पाडण्यासाठी कोटींची उड्डाणे कोठून येतात?असा सवाल करून “मै न खाऊंगा ,न खाने दु गा,”सबसेल वाक्य फेल ठरले असल्याने शिवसेना – संभाजी ब्रिगेड युती ही भावी राजकारणात हिताचीच ठरेल असा दावा रावसाहेब लांडे यांनी केला आहे.