टाकळी ढोकेश्वर येथे नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन-डॉ. भाऊसाहेब खिलारी

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील साई सावली हॉस्पिटल येथे स्व. डॉ. राजेश खांदवे (नेत्रतज्ञ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ साई आस्था चॅरिटेबल ट्रस्टच्या (आस्था आय केअर) माध्यमातून नेत्र रुग्णालय (डोळ्यांचा दवाखाना) मंगळवार दि. ६ सप्टेंबर पासून सुरू होत आहे.
साई सावली हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर येथे सुरू होत आहे.
सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्प दरात सेवा मिळावी हा उदात्त हेतू ठेवून साई सावली हॉस्पिटलचे चेअरमन डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी हा दवाखाना सुरू केला आहे.या हॉस्पिटलचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार, ज्येष्ठ नेते सिताराम खिलारी सर (विश्वस्त जिल्हा मराठा अहमदनगर) डॉ. रवींद्र सोमानी (साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर) त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम टाकळी ढोकेश्वर येथे सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांसाठी अत्यल्प दरात आधुनिक पद्धतीच्या सेवा मिळणार आहे. अहमदनगर येथील खाजगी प्रसिद्ध नेत्रतज्ञ अत्यल्प दरामध्ये उपचार करणार आहेत. या माध्यमातून कॉम्प्युटरद्वारे सर्वसमावेशक डोळ्यांची तपासणी, डोळ्यांच्या मास काढणे, डोळ्यांच्या मागील भागाचे रेटिनाचे निदान व उपचार ( इंजेक्शन व लेसर), मोतीबिंदु व काचबिंदु निदान व उपचार, डोळ्याची पुढील भागाची शस्त्रक्रिया, लासुरची शस्त्रक्रिया, मोतीबिंदु शस्त्रक्रिया (फेकोद्वारे), चष्मे व कॉन्टॅक्ट लेन्स, लहान मुलांचे नेत्रविकार निदान व उपचार अशा प्रकारचे आधुनिक पद्धतीने उपचार हे केली जाणार आहेत. अत्यल्प दरामध्ये उपचार पद्धती उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साई सावली हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. भाऊसाहेब खिलारी, आस्था आय केअरचे डॉ. सौ. चैत्राली सोमाणी सारडा, डॉ. गणेश सारडा यांनी केले आहे.