नेवासा फाटा येथे सापडलेले ५४ हजार रुपये मजुराला परत मिळाले!

वकील सूर्यकांत लिपाने यांचा प्रामाणिकपणा !
सोनई-°[ विजय खंडागळे°]-आजकालच्या काळात कोणाला १० रुपये जर रस्त्यावर पडलेले पाहिले तर,गपचिप ते इकडे तिकडे पाहून खिशात घालताना बघतो,पण एक बिहारी मजुरांचे 54 हजार रुपये परत मिळालेने मजुरांचे चेहऱ्यावर आनंद दिसून आला
वकील सूर्यकांत लिपाने यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे
, ऍड सूर्यकांत लिपाने हे नेवासा फाटा येथे सुकल्पना अर्बन बँक मल्टी. निधी.ली.या ठिकाणी कामानिमित्त गेले असता, तेथील काम आटपून घरी जात असताना रस्त्यावर त्यांना नोटांचा बंडल पडलेला दिसला.आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते,त्यांनी नोटांचा बंडल घेतला,व परत सुकल्पना बँकेत गेले त्यांनी व्यवस्थापक निलेश रासकर यांना याची माहिती दिली, आणि ते पैसे मोजले असता ५४२००/- रुपये होते
त्याच परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते, तेथे बिहारी गोविंद हा परप्रांतीय मजूर सहकारी सोबत काम करत होता,विचारपूस केली असता त्या सर्व मजुरांचे कामाचे पैसे आसल्याची खात्री होता ती रक्कम प्रामाणिकपणे त्यांच्या हातात सुपूर्त केली. त्या मजुरांच्या चेहऱ्यावर एक मोठा आनंद व हसू दिसले.
या प्रमाणिक पणाचे सर्वत्र कौतुक केले आहे. लिपाने हे नगर जिल्हा परिषद औषध निर्माण अधिकारी होते.ते नुकतेच उस्थळ दुमाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवानिवृत्त झाले असून नेवासा कोर्टात वकिली व्यवसाय करतात.