कामगार सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी अविनाश पवार यांची नियुक्ती

अहमदनगर प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांची मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्हा प्रभारी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पदी नियुक्ती चे पञ श्री. अरविंद गावडे माथाडी कामगार सेना राज्य अध्यक्ष यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले
यावेळी सहकार सेना सरचिटणीस अनिल चितळे साहेब , राज्य उपाध्यक्ष डी एन साबळे, नितीन म्हस्के यांनी पवार पारनेर तालुक्यात चागल्या प्रकारे काम करत असल्याचे पक्ष श्रेष्ठींना सांगितले अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ जिल्हा सचिव नितीन भुतारे, मारुती रोहकले, बाळासाहेब
माळी यांनी अविनाश पवार यांनी पारनेर तालुक्यात केलेल्या मनसेच्या माध्यमातून सामाजिक कामाचा पक्ष श्रेष्ठींनी नक्कीच सन्मान केल्याची भावना व्यक्त केली. अहमदनगर जिल्हातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी पवार नक्कीच दिलेल्या जिम्मेदारीच्या माध्यमातून आवाज उठवून कामगारांना न्याय देण्याचं काम करतील असा विश्वास जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांनी बोलताना व्यक्त केला .अविनाश पवार यांच्या निवडीमुळे प्रामाणिक एकनिष्ठपणे पक्ष निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्या प्रती राज साहेब ठाकरे यांचा विश्वास अधोरेखित झाल्याची भावना पारनेर मधील महाराष्ट्र सैनिक व्यक्त करत आहेत तर जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक कामगारांच्या समस्या,बेरोजगारी, कामगारांचे होणारे शोशन ,सुरक्षिततेच्या मुलभुत सुविधा सोडविण्यासाठी सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांनी व सर्व पक्ष श्रेष्ठीनी माझ्या वर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता कामगारांच्यासाठी प्रामाणिक कामं करणार असल्याचे अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
- ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील युवक राजाविचारांनी प्रेरीत होवून गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासाठी काम करत होता अनेक बलाढ्य अपप्रवृत्तीरूपी शक्तींच्या समोर हिमालया प्रमाणे उभा राहून पारनेरच्या मनसेची धुरा संभाळत असताना त्याचा प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा व समाजावर असणारे अतोनात प्रेम याचा विचार करत महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या नगर जिल्हयाच्या माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश पवार यांची निवड करत सन्माननिय राजसाहेबांचा कार्यकर्ता जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पाला ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहचवुन नवा आदर्श उभा करेल-
- अरविंद गावडे
- ( कामगार सेना राज्य अध्यक्ष)