उर्वरित लाभार्थ्यांनी 14 सप्टेंबर पर्यंत pm किसान ची ई केवायसी पूर्ण करावी- तहसीलदार सतीश थेटे

अकोले प्रतिनिधी
पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे
ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे यांनी म्हटले आहे
सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली e-KYC तात्काळ करुन घ्यावी
अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक,ग्रामसेवक किंवा तलाठी यांचेशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे
अकोले तालुक्यात एकूण 40,038 लाभार्थी आहेत
तहसीलदार अकोले यांनी याबाबत तालुक्यातील सर्व 90 csc केंद्र चालकांची बैठक घेऊन eKYC करण्यासाठी मार्गदर्शन केले . लाभार्थ्यांचे यादीप्रमाणे physical verification तसेच सर्व 100% लाभार्थ्यांनी eKYC करून घ्यावी . 14 सप्टेंबर 2022पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे असे तहसीलदार सतीश थेटे यांनी म्हटले आहे
सोबत e-KYC करण्यासाठी लिंक दिलेली आहे
https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx
“””””””””””