ढवळपुरीत मारुती मंदिराच्या सभामंडपाचे सुजित झावरे यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न

पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील ढवळपुरी येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विकास निधी अंतर्गत लालूनाईक तांडा, पठारवाडी, कुटे आखाडा, धनगरवाडे येथील मारुती मंदिर सभा मंडप बांधणे भूमिपूजन कार्यक्रम सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला
.यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की ढवळपुरी गावाने झावरे कुटुंबावर आज पर्यंत खूप प्रेम केले व करत आहेत. स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांना विधानसभेवर पाठवण्यासाठी ढवळपुरी गावचे मोठे योगदान आहे हे मी कधीही विसरणार नाही. ढवळपुरी परिसरामध्ये काम करत असताना आजपर्यंत अनेक विकासाची कामे मार्गी लावले आहे ढवळपुरी भागामध्ये विकासाचा डोंगर उभा राहण्यासाठी मी यापुढील काळातही प्रयत्नशील आहे. विकास कामांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होत असतो. यापुढील काळात ढवळपुरी परिसरातील या ग्रामीण भागातील समाजापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासाचा निधी या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी झावरे म्हणाले तसेच ते पुढे म्हणाले की मी आज येथील मारुती मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन केले खऱ्या अर्थाने ग्रामदैवताचा जीर्णोद्धार माझ्या हातून होत आहे हे मला भाग्यच मिळाले. देव देवता हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे शक्तिस्थान असल्याचे ते यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये ढवळपुरी येथील उदयन्मुख खेळाडू शुभम कुटे याची निवड झाली याबद्दल त्याला सुजित झावरे पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष ऍड. बाबासाहेब खिलारी म्हणालेढवळपुरी परिसरामध्ये झावरे यांनी आजपर्यंत अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. यापुढेही सुजय विखे व सुजित झावरे विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यास समर्थ आहेत त्यांच्या माध्यमातून या भागात विकासाचा डोंगर नक्कीच उभा राहील.यावेळी सुजित झावरे पाटील यांच्या समावेत खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष ऍड. बाबासाहेब खिलारी, अरुणराव ठाणगे, मा. सरपंच ढवळपुरी बबनराव पवार सर, बाबाजी चौधरी, व्होनाभाऊ घोगरे, शिवाजी खोडदे, खंडू कोळेकर, युवा नेते स्वप्नील राहींज, नवनाथ राठोड, विजय जाधव, साहेबराव राठोड, राम जाधव, राजू राठोड, संजय राठोड, लक्ष्मण पवार, नवनाथ जाधव, नंदकुमार कुटे सर, गोटिराम पवार, संदीप पवार, कनिराम जाधव, रोहित जाधव, व्होनाजी जाधव, परसराम चव्हाण, देविचंद राठोड, ताणू राठोड, दगडु पवार, पी. जी. पवार सर, लालूनाईक तांडा, पठारवाडी, कुटे आखाडा, धनगरवाडे वरील धनगर, लमाण समाजाचे महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.