हिंदी भाषा राष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतीक .टी.एन.कानवडे

विलास तुपे
राजुर/प्रतिनिधी
हिंदी भाषा ही देशाच्या सर्वांगीण विकासाची महत्त्वाची भाषा आहे व तिचा वापर दैनंदिन जीवनामध्ये झाला पाहिजे. हिंदी भाषा राष्ट्राच्या एकात्मतेचे प्रतिक आहे. असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे विद्यमान सचिव मा.. टी.एन. कानवडे यांनी केले.ते राजूर येथील ॲड. एम.एन.देशमुख महाविद्यालयातील हिंदी विभागाने आयोजित केलेल्या ” हिंदी दिवस समारोह ” कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जगन्नाथ आरोटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य
प्रोफेसर डॉ.बी.वाय.देशमुख हे उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.आपल्या प्रमूख भाषणात प्रा.जे. डी.आरोटे यांनी हिंदी भाषेचे महत्त्व प्रतिपादन करून,हिंदी ही भारतीय राज्यांना जोडणारी भाषा आहे. देशांमध्ये सोशल मीडिया, चित्रपट, तसेच मनोरंजन या क्षेत्रात हिंदीचे वर्चस्व आजही टिकून आहे. इतकेच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये विज्ञान हा विषय सुद्धा हिंदी भाषेतून शिकवला जातो. असे मत व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.वाय. देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा वापर आपल्या रोजच्या संभाषणात करून ही भाषा समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. हिंदी भाषा ही अखंडतेचे प्रतीक आहे या कार्यक्रमात कु.माधुरी जाधव,कु. अक्षदा पाबळकर व वैभव बांगर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ बी.टी.शेणकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. बी के थोरात यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. बबन पवार, प्रा संतोष अस्वले व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
