अकोले तालुका मेडिकल असोसिएशन चा स्तुत्य उपक्रम
अकोले आय टी आय ला वर्षभर प्रथमोपचार साहित्य

अकोले प्रतिनिधी-
फार्मासिस्ट डे चे औचित्य साधून अकोले मेडिकल असोसिएशनच्या वतीने विना अनुदानित तत्वावर चालू असलेल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोले या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रथमोपचारासाठी आवश्यक साहित्य संस्थेचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांचे कडे सुपूर्त केली.आणि एक वर्ष भर आवश्यकतेनुसार संस्थेला प्रथमोपचार साहित्य देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रतिनिधी अरुण सावंत यांनी सांगितले. यावेळी अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे जिल्हा प्रतिनिधीअरुण सावंत,जेष्ठ संचालक अरीफभाई तांबोळी,सचिन शिंदे,सचिन आवारी, राजेश धुमाळ,रवींद्र कोटकर हे उपस्थित होते. सर्व प्रथम प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांचा शाल देऊन मेडिकल असोसिएशनच्या वतीने अरीफभाई तांबोळी यांनी सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी आभार व्यक्त करताना म्हणाले की, तालुक्यातील मेडिकल असोसिएशनचे सामाजिक जाणिवेतून चालू असलेले कार्य हे कौतूकास्पद असून त्यांनी नेहमीच सामाजिक कामासाठी मोठे योगदान दिले आहे.सध्या पशुधनावर आलेल्या लंपी आजारावर उपचार करण्याच्या दृष्टीने व पशुधन वाचविण्यासाठी मेडिकल असोसिएशन ने औषधे देऊन मोठे योगदान दिलेले आहे.तसेच तालुक्यातील एकमेव औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही कायम विना अनुदानित तत्वावर चालू असून या संस्थेला आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीने प्रथमोपचार साहित्य हे लाख मोलाचे असल्याचे सांगितले. स्वागत व प्रास्ताविक सचिन शिंदे यांनी केले.तर आभार अरुण सावंत यांनी मानले.–
—–