इतर

संगमनेर तालुक्यातील त्या मृतांच्या कुटुंबास प्रत्येकी ११ लाखांची मदत!

जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – पालकमंत्री विखे पाटील

संगमनेर प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील खंदार माळवाडी येथे विजेचा शॉक लागून चार लहान मुलांचा करून अंत झाला

यानंतर आज महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या दुर्घटना ग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली या कुटुंबीयांना प्रत्येकी 11 लाखाची मदत त्यांनी जाहीर केली तर या घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषि व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश त्यांनी दिले

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील .अनिकेत अरुण बर्डे, .ओंकार अरूण बर्डे, .दर्शन अजित बर्डे व .विराज अजित बर्डे या चार भावंडांचा ८ ऑक्टोबर रोजी विजेच्या तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या कुटूंबाची राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खंदरमाळवाडी येथे भेट घेतली.

आपल्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.” अशा शब्दांत मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी दिलासा दिला. काल रात्री मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतरही अंत्यविधी न करण्याचा निर्णय कूटूंब आणि ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या चारही मुलांवर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी महसूलमंत्री विखे पाटील यांनी येठेवाडी येथील ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांशी एकत्रितपणे चर्चा करुन गावातील प्रलंबित प्रश्न जाणून घेतले.

वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच कालची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनी, मुख्यमंत्री सहायता निधी आणि स्व.गोपिनाथ मुंढे अपघात विमा योजनेतून प्रत्येकी कुटूंबियांना ११ लाख रुपयांची मदत देण्यात येईल असे महसूलमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी म्हणाले

वादळीवाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या वीज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा तातडीने पूर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीने विशेष मोहिम जिल्ह्यांमध्ये हाती घेण्याबाबतही सुचनाहीही महसूलमंत्र्यानी अधिकाऱ्यांना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button