पारनेर तालुक्यात २५ हजार ८२७ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड!

गहू पिकाकडे ,शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
दादा भालेकर
टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी
शेतक-यांचे हमखास नगदी प्रमुख पीक म्हणून कांदयाकडे पाहीले जाते कांदयाला सध्या बाजारभाव चांगल्या प्रमाणात मिळत असल्यामुळे पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाची लागवड होताना दिसत आहे.
पारनेर तालुक्यात यावर्षी पाऊसाने मोठा दिलासा दिल्याने मांडओहळ धरणासह परिसरातील काळू, तिखोल,ढोकी नं.१,ढोकी नं.२,पळशी,मांडवा,भाळवणी सह सर्वत्रच पाझर तलावांसह नाले,केटीवेअर,विहीरी तुडूंब भरले असल्यामुळे रब्बी हंगामातील पिके तरी हातात पडतील ही आशा शेतक-यांची पल्लवीत असून चांदवड सह गावरान कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे.तर अजूनही कांदा लागवड सुरूच आहेत.
पारनेर तालुक्यामध्ये या वर्षी २५ हजार ८२७ हेक्टर कांदा लागवड झाली असून यंदाचा खरीप हंगामाने पदरी निराशाच पडली असून पारनेर तालुक्यातील चार मंडल निहाय रब्बी हंगामामध्ये
टाकळी ढोकेश्वर मंडल मध्ये सरासरी ७ हजार ५१४ हेक्टर,
निघोज मंडलमध्ये ८ हजार ५९१ हेक्टर,
सुपा मंडल मध्ये २ हजार ६२० हेक्टर तर
पारनेर मंडलमध्ये ७ हजार १०२ हेक्टर वर कांदा लागवड झालेली आहे.
पारनेर तालुक्यात रब्बी हंगामामध्ये ज्वारी ३७ हजार १७० हेक्टर,गहू ३ हजार ६४ हेक्टर,हरबरा ४ हजार ९६८ हेक्टर,तर भाजीपाला २ हजार ७०० हेक्टरवर असून ज्वारी पाठोपाठ सरासरी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड असून अजूनही लागवड सुरू असून यामध्ये प्रशांत,पंचगंगा,येलोरा,इस्टवेस्ट,बाँम्बेसुपर,जिंदाल व दिपक कंपनीचे कांदा बियाणांचा रोपांचा सामावेश आहे.
आज मितीस टाकळी ढोकेश्वर,तिखोल,काकणेवाडी, कर्जुले हर्या,पोखरी,गुरेवाडी,वासुंदे,वडगाव सावताळ, वनकुटे,पळशी,खडकवाडी,वारणवाडी,मांडवे,भाळवणी आदी पट्यातील शेतीमध्ये एकीकडे कांदा लागवड तर दुसरीकडे कांदा काढणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
पारनेर तालुक्यातील नगदी पिक म्हणून कांदयासाठी प्रसिध्द असून गेल्या काही वर्षाचा दुष्काळ पाहता शेतक-यांच्या हातात काहीच पडले नाही.मात्र यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून शेतक-याच्या पदरात बाजरी सोडून काहीच पडले नाही,पेरलेला कांदा, वाटाणा,मूग व राजमा तिनही पिके पाऊसामुळे वाया गेली असून रब्बी हंगाम तरी शेतक-यांसाठी चांगला दिसत असताना कांदयाचे दोन पैसे मिळतील या आशेवर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली होती.मात्र गेल्या मध्यंतरी वादळी पावसाने पुर्णपणे कांदा झोडपल्याने ५० टक्के कांदयाला फटका बसल्याने ४० ते ५० टक्केच कांदा हातात पडले असून गळीतामध्ये ५० टक्के घट झाली आहे.आजचे बाजारभाव पाहता कांदा पीकाला चांगला बाजारभाव मिळत असतानाही वादळाच्या फटक्यामध्ये सापडल्याने शेतक-यांचे पुर्ण बजेट कोलमडले आहे.
पारनेर तालुक्यात बहुतांश भागात ज्वारी बरोबर हरबरा,गहू पेरणीही मोठया प्रमाणात झाली असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एकीकडे शेतक-यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या असताना मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने लागवड केलेले कांदा रोपे जमिनीमध्ये सडले असून हजारो रूपये खर्च करून मोठी रक्कम मोजून कांदा बी व रोपांची लागवड केली तर काही लागवडीला आला असताना पावसाने कांदयाचे मोठे नुकसान केले असून हजारो रूपये आजतरी पाण्यातच गेले आहे.भविष्यकाळात लागवड होत असलेला कांदा ही वांदा करणार का?हे येणारा काळच ठरविणार असून कांदयाने शेतकरी तारणार का अपेक्षांचा भंग होणार?हे अनुत्तरीतच.

गेल्या अनेक वर्षाचा सारासार विचार केला तर रब्बी हंमाचा विचार करून मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड झाली असून सरासरी ५ रूपये खर्च प्राँक्डँक्शन साठी येत असून एकराला किमान ७५ हजार रूपये खर्च येत आहे. एकरी १५ टन उत्पादन अपेक्षित असून सरासरी १० रूपये बाजारभाव मिळाल्यास सव्वा ते दीड लाख रूपये उत्पादनास बाजारामध्ये मिळत असून यंदा कांदयामध्ये शेतक-याचा तोटा होणार नसून शेतक-यांना तारक ठरणार होता.मात्र मागील महीण्यातील वादळी पावसाचा कांदयाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यात धुक्याने तर पुर्ण कांदा पीके कोलमडल्याने सरासरी ५० ते ६० टक्के कांदयाचे नुकसान पाहता ४० टक्केच कांदा उत्पादन शेतक-यांच्या हातात पडले असून ५० टक्के गळीत घटल्याने शेतक-यांच्या हातात खुळखुळणारा पैशावर विरजन पडले असून पदरी निराशाच पडली आहे.त्यामुळे शेतक-यांचे आर्थीक नुकसान पाहता कर्जबाजारात बुडालेला दिसत आहे.याकडे शासनाने लक्ष घालून कांदा सारखी नगदी पिकांना अनुदान देण्याची गरज असल्याचे मत टाकळी ढोकेश्वरचे प्रतिष्ठीत व्यापारी विलास कटारिया यांनी व्यक्त केले.