मोहटादेवी चरणी भाविकांचे दोन कोटीचे दान!

पाथर्डी प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे व नवसाला पावणारी आई जगदंबा मोहटादेवी जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. यामुळे नवरात्र उत्सवात लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात
श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर संपन्न झालेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले या काळात भाविकांनी सुमारे २ कोटी
रुपयांचे भरभरून दान देवीच्या दानपेटीत अर्पण केले.
देवस्थानचे दानपेट्यामधील सोने चांदीसह रोख रक्कमेची मोजदाद नुकतीच धर्मादाय आयुक्त यांचे
प्रतिनिधी डॉ. डी. एस. आंधळे, देवस्थान विश्वस्त, बँक अधिकारी, पाथर्डी येथील शेवाळे सराफ व
कर्मचारी यांनी पोलीस सुरक्षा व सीसीटीव्हीचे निगराणीमध्ये केली.यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी २७ लाख ६० हजार ५५४, अशुद्ध सोने ४० तोळे अंदाजे मूल्य १६ लाख ६४ हजार, अशुद्ध चांदी वस्तू १३ किलो ८१० ग्रम मूल्य ५ लाख १३ हजार ९९२ मात्र, चांदीचे छत्र व पंचारती मूल्य ३ लाख मात्र, तसेच विविध देणगी पावती ४० लाख २९ हजार ९३०, ऑनलाइन स्वरुपात देणगी ४ लाख ८६ हजार २०३ रुपये प्राप्त झाले.
मुळचे संगमनेर व मुंबई येथील देवीभक्त उद्योजक बाबूराब सांगळे यांनी देवस्थानास सुमारे ३ लाख रुपये किमतीची अद्यावत सी सी टीव्ही सिस्टम देणगी स्वरुपात अर्पण केली. अशा विविध स्वरुपात रुपये २ कोटींच्यावर उच्चांकी देणगी देवस्थानास प्राप्त झालीअशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.
नवरात्र उत्सव यशस्वी होणेसाठी
अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश सुधाकर
यार्लगड्डा यांचे मार्गदर्शनाखाली देवस्थानचे
चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर,गटविकास अधिकारी डॉ. जगदीश
पालवे, विश्वस्त भीमराव पालवे, अशोक विक्रम दहिफळे, अशोक दहिफळे भगवान आजिनाथआव्हाड, सरिता दहिफळे, अॅड.विजयकुमार वेलदे, अॅड. सुभाषराव काकडे, सतीश वैद्य, सुधीर लांडगे,डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी भाविकांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिली.