श्री ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याने प्रती टन 200 रू प्रमाणे दिपावली बोनस देऊन दिवाळी गोड .

तर तहसील समोर चटणी
भाकरी खाऊन निषेध नोंदविणार
नेवासा प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडे व मुळा सहकारी साखर कारखाना सोनई यांनी शेतकरी अडचणीत असताना प्रती टन 200रू प्रमाणे F.R.P व्यतिरिक्त दिपावली बोनस देऊन शेतकरी कुटुंबांची दिवाळी खर्या अर्थाने गोड करावी.
कारखाने जेव्हा ओरड करतात की आम्ही अडचणीत आहोत तेव्हा शेतकरी घरादाराचा विचार न करता पुढाकार घेतो मग कारखान्यांनी शेतकरी अडचणीत असताना यांनी पुढाकार घेण्यास काय हरकत आहे.
असे केल्यास कारखाने खरोखरच शेतकऱ्यांचे हित जपतात हे दाखवून देण्याची त्यांना संधी मिळेल
या मागणीचा कारखान्यांनी संवेदनशीलपणे विचार केला नाही व आर्थिक मदत देण्याबाबत टाळाटाळ केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शेतकरी संघटना दिवाळी सण तहसील कार्यालय समोर चटणी भाकरी खाऊन निषेध व्यक्त करणार आहेत याबाबाबतचे निवेदन तहसीलदार यांना दिले
यावेळी मनसेचे सचीन गव्हाणे, ,सतिश लंघे , शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले ,भाजपचे प्रताप चिंधे, भाऊसाहेब फुलारी, देविदास साळुंके ,अंकुश काळे ,आदीनाथ पटारे ,पोपटी भणगे ,काँग्रेसचे संदिप मोटे ,शोभा पातारे,
शेतकरी संघटनेचे नेते ञिंबक भदगले व मनसे नेते मिराताई गुंजाळ आदी उपस्थित होते