नेवासा तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पिकांचे प्रचंड नुकसान

नेवासा प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला खरिपाची उभे पिके पाण्यात गेली आहे यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढ्या नाल्यांना पूर आल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला . , शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबी- कापूस, तुर, ऊस, कांद्याचे रोप व विविध पिकाचे मोठे नुकसान झाले , प्रशासनाने त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. अशी मागणी देडगाव, जेऊर, पाचुंदा माका, कौठा, शहापूर, देवगाव व परिसरातील नागरिकांनी केली आहे . जोमात आलेली पिक, शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास या अतिवृष्टी पावसाने हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
देडगाव तून बाहेर गावी जाणारी रस्ते ,माका, कुकाना, कौठा, जळगाव या गावचा दगफुटी सदृश पावसाने रस्त्याना ओढ्याच स्वरूप प्राप्त झाले यामुळे बाहेरगावी जाण्यास काहीकाळ सम्पर्क तुटला .