राजूर च्या देशमुख महाविद्यालयत निर्भय कन्या अभियान शिबीर

राजूर /प्रतिनिधी
पैसा आणि संपत्तीपेक्षा मनाची व विचारांची शक्ती ही सर्वात महत्वाची आहे. विचार आणि मनाच्या ताकदीमध्ये एक वेगळीच प्रेरणा असते. अकोले तालुक्याच्या अन्नमाता ममताताई भांगरे (उंच माझा झोका पुरस्कार प्राप्त) यांनी केले.
रासायनिक खते ही अखिल मानवजातीसाठी विष आहेत म्हणून सेंद्रिय शेती ही मानवासाठी शाश्वत आहे असेही त्या म्हणाल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ऍड एम. एन. देशमुख महाविद्यालय राजूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
मा. स्मिता गुणे, ज्येष्ठ समाजसेविका, यांनी शरीराबरोबर मनही सक्षम व्हावयास हवे. मनाची ताकद कोणत्याही संकटावर मात करू शकते असे विद्यार्थिनींना संबोधित केले. यावेळी महाविद्यालयातील १७० विद्यार्थीनाना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मा.सुभाष मिंडे यांनी दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख होते. सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. गिते तर आभार डॉ. डी. बी. तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. एल. बी. काकडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.थोरात, डॉ.आर.ए. कढणे, प्रा.जी.एस.कुसमुडे, प्रा. परते यांनी परिश्रम घेतले
