अकोल्यात कांदा मार्केट दिवाळीमध्ये ही सुरूच राहणार!
अकोले /प्रतिनिधी
अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा मार्केट दिवाळीच्या कालावधीमध्ये सुरूच राहणार असल्याचे बाजार समितीने जाहीर केले आहे
अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 20/10/2022 रोजी 2हजार 292 कांदा गोणी आवक झाली. कांद्यास बाजार भाव मिळालेले आहेत.
न.1 ला रु 2101 ते 2551
न.2 ला रु.1501 ते 2100
न.3 ला रु.1001ते 1401
गोल्टी ला रु. 501 ते 901
*खाद रु. 101 ते 401 * प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत अकोले बाजार आवारात रविवार,मंगळवार,गुरुवार या तीन दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळत आहेत.कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 12 ते 7 वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल , मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी घ्यावी
शेतकरी बंधूनी कांदा विक्री करताना, ज्या व्यक्तीचे नावे 7/12 क्षेत्र आहे त्याचे पूर्ण नाव,गाव व इतर माहिती कांदाची विक्री पट्टी बनविताना बिनचूक द्यावी*
50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्री साठी आनावा, असे आवाहन बाजार समितिचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक, सर्जेराव कांदळकर व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.