नेप्तीत श्री वेताळ बाबाचा भंडारा हजारो भाविकांनी घेतला आमटी भाकरीचा महाप्रसाद!

हिंदू संस्कृतीत अन्नदानाला महत्त्व -आ. निलेश लंके
अहमदनगर /प्रतिनिधी
नेप्ती (ता. नगर) येथील पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वेताळबाबा महाराजांचा भंडार्याचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला.
भंडार्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री वेताळ बाबा मित्र मंडळ, समता परिषद व द किंग ग्रुपच्या वतीने भाविकांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या भंडार्याचे सहावे वर्ष असून, या भंडार्यात हजारो भाविकांसाठी आमटी, भात, शिरा व बाजरीची भाकरीचा महाप्रसाद करण्यात आला होता.
गावातील या भंडार्याचे प्रमुख आकर्षण आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो.भंडार्यानिमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून ग्रामस्थांना सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करुन परिसरात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. समता परिषदेचे अध्यक्ष शाहूराजे होले यांच्या हस्ते वेताळ बाबा महाराजाना अभिषेक घालण्यात आला. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाला आमदार निलेश लंके यांनी भेट देऊन वेताळबाबा महाराजांची विधीवत पूजा केली. आमदार लंके म्हणाले की, हिंदू संस्कृतीत अन्नदानाला मोठे महत्त्व आहे. विविध प्रकारचे दान लोक करतात, पण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे . या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीही अनेक कार्यक्रम राबवले आहेत.कार्यक्रमाच्या योग्य नियोजनाबद्दल त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्याचे कौतुक केले.
रात्री भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनात ग्रामस्थ तल्लीन झाले होते. गवळण व भक्ती गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी माजी सरपंच अंबादास पुंड, अनुराग आगरकर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, माजी संचालक वसंत पवार, माजी सरपंच संजय जपकर, उपसरपंच जालिंदर शिंदे, शिवाजी होळकर, बाबासाहेब जाधव, प्रा. भाऊसाहेब पुंड, भानुदास फुले, नानासाहेब बेल्हेकर हरिभाऊ पुंड ,तुषार भुजबळ, सागर शिंदे, संतोष चौरे, बहिरू होळकर, सौरभ भुजबळ, नितीन शिंदे, राहुल भुजबळ, संकेत भुजबळ, कुणाल शिंदे, तेजस नेमाने, सार्थक होले, विनायक बेल्हेकर, निखिल होले, अमित दरेकर, संकेत कर्पे, आदित्य पुंड ,दर्शन फुले ,विजय कर्पे,अण्णा होळकर, ओंकार भुजबळ, रमेश रावळे, हर्षल चौरे समता सैनिक मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
………….