राजूर च्या देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

अकोले/प्रतिनिधी-
बारामती येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे आंतर महाविदयालय कुस्ती स्पर्धेत अँड.एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर येथील
1) लांडगे शुभम दिलीप
57किलो (प्रथम क्रमांक )
2)सदगीर भाऊरावआनंदा
67 किलो(प्रथम क्रमांक)
3)हराळ सुदर्शन दत्तराव 79 किलो (प्रथम क्रमांक)
4) वने घनशाम मछिंद्रनाथ
97 किलो (द्वितीय क्रमांक
या विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्पर्धसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
या सर्व विजेत्या कुस्ती विद्यार्थ्यांना प्रा.विकास नवले व तानाजी नरके (आंतरराष्ट्रीय कुस्ती पदक विजेते) यांचे मार्गदर्शन लाभले. कुस्ती विजेत्या विद्यार्थ्यांचे अँड .मनोहराराव नानासाहेब देशमुख (अध्यक्ष सत्यनिकेतन संस्था,राजुर) टी.एन.कानवडे (सचिव,
सत्यनिकेतन संस्था राजुर ) मिलिंदशेठ उमराणी,कोषाध्यक्ष विवेकजी मदन व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.