आजचे पंचांग व राशिभविष्य दि २५/११/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ०४ शके १९४४
दिनांक :- २५/११/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५०,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- व्दितीया समाप्ति २२:३५,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति १७:२१,
योग :- सुकर्मा समाप्ति ०८:४३, धृति २८:५९,
करण :- बालव समाप्ति १२:०८,
चंद्र राशि :- वृश्चिक,(१७:२१नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – अनुराधा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०५नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५३ ते १२:१६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:०६ ते ०९:२९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२९ ते १०:५३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१६ ते ०१:४० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
चंद्रदर्शन(१९:२३प.), मु. ३० साम्यार्घ,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ०४ शके १९४४
दिनांक = २५/११/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. ह्या विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. असे असले तरीही बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
वृषभ
आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे.
मिथुन
आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही.
कर्क
आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास सुद्धा करू नका. आणखी वाचा…
सिंह
आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
कन्या
आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय व मित्रपरिवार ह्यांच्याशी असलेल्या संबंधात गोडवा वाढेल. आणखी वाचा…
तूळ
आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा – समाधानाचे वातावरण राहील. मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल.
धनु
रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल. एखादा अपघात संभवतो. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. प्रकृती सुद्धा बिघडू शकेल.
मकर
आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. पत्नी व संततीचा सहवास लाभेल.
कुंभ
आज शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात मान – सन्मान प्राप्त होतील.
मीन
आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका व मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा.
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर