इतर

शिर्डी लोकसभा मतदार संघात भाजपा उमेदवार लढणार,कार्यकर्त्यांनी कामाला लागा!

शिर्डी दि२५

शिर्डी लोकसभा मतदारसंघ भाजपा हा कमळ चिन्हावर लढविणार असून कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी असे आवाहन लोकसभा प्रवास योजना राज्य संयोजक माजी मंत्री संजय भेगडे यांनी केले आहे.

             शिर्डी येथे आयोजित भारतीय जनता पार्टी, उत्तर नगर जिल्हा शिर्डी लोकसभा प्रवास योजना संदर्भात जिल्हा बैठक शिर्डी येथे राज्य संयोजक माजी मंत्री मा.बाळा भेगडे यांचे प्रमुख उपस्थित झाली. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार चंद्रशेखर भाऊ कदम, बाळासाहेब मुरकुटे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर उपस्थित होते.

          श्री. भेगडे बोलताना म्हणाले की, देशातील काही मतदारसंघावर भाजपा ने लक्ष केंद्रित केले असून महाराष्ट्र राज्यात जे मतदारसंघ आपण कधीच लढवले नाही असे १८ मतदार संघ आहे. शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ आपणास जिंकवायचा असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. गुजरात निवडणूक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा दौरा या मतदारसंघात होणार आहे. जलजीवन मंत्री प्रल्हादसिंह पटेल या मतदार संघाचे पालक आहेत. ” हर घर जल, नल से जल ” हि मोदीजी ची महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1 हजार कोटी पेक्षा जास्त निधी चे काम सुरू आहेत. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होईल असेही मत व्यक्त केले. 

         यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे, सुधाकर गुंजाळ, गणेश राठी, अकोले तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, संगमनेर तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, राहता तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, कोपरगाव तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्ता काले, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दिपक पटारे, शहर अध्यक्ष मारुती बिंगले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राम आहेर आदीनी मागील दौऱ्याचे अनुभव कथन केले. यावेळी शिर्डी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांचे हस्ते श्री. भेगडे यांचा सत्कार करण्यात आला.

        प्रास्तविक जिल्हा संयोजक नितीन दिनकर यांनी तर सूत्रसंचालन योगीराज परदेशी यांनी केले. आभार सोशल मिडिया सेल जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button