राजूर विकास आघाडीचे वतीने दत्त मंदिर परिसर व मराठी शाळा परिसरात साफसफाई

राजूर दि ४ राजूर विकास आघाडीच्या वतीने आज राजूर मध्ये दत्त मंदिर परिसर व मराठी शाळा परिसरात साफसफाई करण्यात आली
राजूर विकास आघाडीचे नेते व अकोले तालुक्याचे आमदार डॉ श्री किरण लाहमटे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजूर विकास आघाडीचे अध्यक्ष श्री विनय सावंत याच्या उपस्थित व राजूर गावच्या नवनिर्वाचित सरपंच पुष्पाताई निघळे यांच्या उपस्थितीत स्वच्छ राजूर सुंदर राजूर व्हावे यासाठी आज सकाळी सर्व राजूर विकास आघाडीच्या कार्यकात्यानी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत राजूर मध्ये साफसफाईचे काम केले
यापुढे प्रत्येक रविवारी राजूर गावातील प्रत्येक वार्डात असे साफसफाई करण्याचे काम राजूर विकास आघाडी करणार आहे साफसफाई करत असताना स्थानिक नागरिकांना यावेळी घर असो दुकानदार असो हॉटेल व्यवसाय करणारे असो प्रत्येकाला जाऊन सांगण्यात आले की आपला कचरा रस्त्यावर न टाकता कचरा गाडीत टाकावा जेने करून राजूर गाव स्वच्छ आणि सुंदर दिसेल राजूर मध्ये रोगराई होणार नाही मच्छर चे प्रमाण वाढणार नाही

आज सकाळी मोठ्या प्रमाणात राजूरकर या साफसफाई च्या कामात मदत करत होते जीप चालक मालक संघटना यांनीही यावेळी साफसफाई करण्यास आपला हातभार लावला यावेळी विनय सावंत ,पुष्पाताई निघळे ,भिमाशंकर कवडे,दत्ता निघळे रामदास पवार ,विजय पवार ,भगवान पवार ,रवी पवार ,,शुभम एलमामे , सुनील भोत ,प्रमोद देशमुख ,आकाश माळवे लक्ष्मण जाधव संगीता जाधव अमन तांबोळी ओंकार नवाळी दाऊद शेख जालिंदर नवाळी राजू चोथवे तसेंच राजूर ग्रामपंचायत चे सफाई कर्मचारी ही यावेळी उपस्थित राहून साफसफाई च्या मोहिमेत भाग घेतला