अतिवृष्टी भरपाईची रक्कम शेतकऱ्यांचे खात्यावर वर्ग करा – दत्तात्रय शिंदे

नेवासे । प्रतिनिधी
जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसान भरपाई ची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सर्व पिके वाया गेले आहे या पिकांची पंचनामे ही झाले आहेत मात्र राज्य शासनाने अद्यापही या अतिवृष्टीने वाया गेलेल्या पिकांची भरपाई दिली नाही पंचनामाचा केवळ फार्स केला आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे असताना अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला आधार देणे गरजेचे असताना देखील सरकार अद्यापही नुकसान भरपाई चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करत नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे शिंदे -फडणवीस सरकारने तातडीने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक नुकसान भरपाईची रक्कम त्वरित वर्ग करावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे