अकोल्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 80 टक्के मतदान!, मंगळवारी मतमोजणी

अकोले प्रतिनिधी
मुदत संपलेल्या अकोले तालुक्यातील 11 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता यापैकी शीळवंडी व सोमलवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर आज रविवारी 18 डिसेंबर रोजी उर्वरित नऊ ग्रामपंचायती मतदान झाले तालुक्यातील या 9 ग्रामपंचायती साठी सरासरी 80 टक्के मतदान झाले उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले मंगळवारी दिनांक 20 रोजी मतमोजणी होणार आहेत
. ९ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. . यामुळे। या लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
अकोल्यातील आंभोळ, भंडारदरा, चास, डोंगरगाव, गुहिरे, लहित बुद्रुक, शेंडी, वाकी, मुरशेत या महत्वाच्या ग्रामपंचायत च्या निवडणूका पार पडल्या
निवडणुकीत सरपंच पदासाठी ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु २२ उमेदवारांनी सरपंच पदासाठी माघार घेतल्याने 25 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १९३ पैकी ९२ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर १०१ उमेदवार ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिगणात होते.
सरपंच पदासाठी सोमलवाडी व शिळवंडी या २ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. त्याचबरोबर ४१ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या शेंडी ग्रामपंचायत आणि गुहिरे ग्रामपंचायतील सदस्य पदाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या, मात्र सरपंच पदासाठी निवडणूक झाली.
आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये ९ ग्रामपंचायतीमध्ये २८ केंद्र होते या सर्व केंद्रावर 79.67 टक्के मतदान झाले मतदान झाले आहे.
आंभोळ -(71.93टक्के) भंडारदरा – ( 67.04टक्के) चास- (83.89टक्के) डोंगरगाव – (86.41टक्के ) गुहिरे-(80.82टक्के) लहीत बुद्रुक -(86.85टक्के) मुरशेत -(79.05 टक्के) शेंडी -(80.37टक्के)
वाकी – (74.50टक्के) असे मतदान झाले यात 11हजार730 एकूण मतदारांपैकी 4949 पुरुष तर 4396 स्त्री अशा 9345 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले सरासरी 79.67% मतदान झाले या निवडणुकीत सर्वाधिक 86.85% मतदान लहित बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये झाले तर सर्वाधिक कमी 67.4% मतदान भंडारदरा ग्रामपंचायत मध्ये झाले
अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे, नायब तहसीलदार ठकाजी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकूण २८ मतदान केंद्रांवर १४० महसूल कर्मचारी तसेच अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५६ पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मतदान शांततेत पार पडले.