घोडेगाव चा जनावरांचा बाजार पुन्हा सुरू होणार !

दत्तात्रय शिंदे
अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा घोडेगाव चा जनावरांचा बाजार आता पुन्हा सुरू होणार आहे लंपी या जनावरांच्या चर्मरोग साथीचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्ह्यातील हा मोठा जनावरांचा बाजार काही दिवसापूर्वी बंद केला होता यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या बाजारातून होणारी लाखो रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल थांबली होती ती आता पुन्हा सुरू होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार गेल्या साडेतीन महिन्यापासून बंद केला होता दर शुक्रवारी होणारा घोडेगावचा जनावरांचा बाजार शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ पासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडूनदेण्यात आली गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांचाबाजार नियमित सुरू होणार आहे, बाजार सुरू होणार असल्याने शेतकरी, पशुपालक,व्यापारी,दलाल व व्यावसायकांनी आनंद व्यक्त केला
राज्यात व अहमदनगर जिल्ह्यात ३ महिन्यांपूर्वी
लंपी आजाराने थैमान घातले होते, त्वचेच्या या
घातक आजाराने नेवासा तालुक्यात देखील थैमान
घातले, अनेक शेतकऱ्यांची जनावरे मरण पावली,
आजाराचा वाढता प्रसार व घातकता लक्षात घेता,
प्रशासनाच्या वतीने ०९ सप्टेंबर २०२२ पासून
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा
बाजार बंद ठेवण्यात आला होता.बाजार समिती प्रशासनाने बाजार पुन्हा सुरू केल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे
अनेक महिन्यापासूनबाजार बंद असल्याकारणाने बाजारावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना अडचणींचा सामनाकरावा लागत होता,खेड्यावर गाई, म्हशी विक्री करण्यावर निर्बंध असल्याने त्रास होत होता.शेतकऱ्यांना व पशुपालकांना मोठा आर्थिक फटकाबसला, बाजार सुरू होत असल्याने सर्वांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.