इतर

पोलिसांच्या खुर्चित बसणे पडले महागात … !

पारनेर न्यायालयाने ठोठावला दंड व कारावासाची शिक्षा

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील निघोज येथील पोलिस चौकीत विनाकारण प्रवेश करून पोलिस अधिकाऱ्याच्या खुर्चित बसल्या प्रकरणी आरोपी राहुल भाऊसाहेब वराळ (वय – ३२ ) याला पारनेर प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोराडे – कपूर यांनी ५०० दंड / पाच दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की,
निघोज येथील एक महीला ८ डिसेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास निघोज पोलिस चौकीत तक्रार सांगत असताना राहुल वराळ हा विनाकारण पोलिस चौकीत आला व पोलिस अधिकाऱ्याच्या खुर्चित बसला . त्यानंतर त्याने सदर महीलेच्या तक्रारीची लगेच दखल घ्या असा आदेश तेथील ठाणे प्रमुखाला दिला .
या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियावर
व्हायरल झाल्यानंतर लोकजागृती सामाजिक संस्थेने पोलिस महानिरीक्षक व अधिक्षक यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार करून दोषींवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा ईशारा दिला होता . त्यानंतर लगेचच निघोज पोलिस चौकीचे ठाणे प्रमुख हवालदार गणेश डहाळे यांनी राहुल वराळ विरोधात फिर्याद दिली . त्यानंतर पोलिसांनी आरोपी वराळला पारनेर न्यायालयासमोर हजर असता राहुल वराळ याने न्यायालयासमोर गुन्ह्याची कबुली दिली .
पारनेर न्यायालयाने पोलिसांनी
दिलेल्या फिर्यादी वरून फौजदारी दंड संहीता २५२ / २ व मुंबई पोलिस कायदा कलम १२० नुसार राहुल वराळ याला दोषी ठरवून पाचशे रुपये दंड किंवा दंड न भरल्यास पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली .
दरम्यान , आरोपी राहुल वराळ याने पाचशे रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केल्याने त्याची पाच दिवसांच्या कारावासा पासून सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . फिर्याद दाखल झाली त्याच दिवशी या गुन्ह्याचा निकाल जाहीर करण्यात आला .

[ राहुल वराळ वर यापुर्वी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत . निघोज चौकीत राहुल वराळ सह अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची नेहमीच वर्दळ असते . असे प्रकार यापुढे थांबले पाहिजेत . लोकजागृतीच्या तक्रारीनंतर पोलिस व पारनेर न्यायालयाने केलेल्या कारवाई वर समाधानी आहोत .

  • सौ. कांता लंके
    सचिव – लोकजागृती सामाजिक संस्था ]

हा व्हिडिओ सोशल मीडिया वर झाला होता व्हायरल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button