इतर
गोरेगावचे उपसरपंच अण्णासाहेब नरसाळे यांचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्याकडून सन्मान

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या गोरेगावच्या उपसरपंच पदी अण्णासाहेब नरसाळे यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी पंचायत समिती सभापती गणेश शेळके, सेनापती बापट पतसंस्थेचे व्यवस्थापक बापूसाहेब झंजाड उपस्थित होते.
नरसाळे यांनी गावातील व परिसरातील गोरगरीब जनतेची सेवा करावी व मिळालेल्या संधीचा गावाच्या हितासाठी उपयोग करुन गावचे आदर्शपण जपावे अशा शुभेच्छा दिल्या.