इतर

अहमदनगर जिल्हा पेन्शनर्स उपाध्यक्षपदी “कारभारी शिकारे” यांची निवड


सोनई-प्रतिनिधी-अहमदनगर जिल्हा पेंशनर्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी नेवासा तालुकातील सोनई येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कारभारी दगडू शिकारे यांची नुकतीच जिल्हा संघटनेच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.
नगर येथील पेंशनर्स कार्यलयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.अध्यक्ष स्थानी जिल्हा अध्यक्ष द.मा.ठुबे हे होते. असोसिएशनच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न,वयपरत्वे पेन्शन, वाढ,फरक,निवडश्रेणी, कुटुंब निवृत्ती पेन्शन, इ. प्रश्न वरिष्ठशी सुसंवाद साधून तसेच सभासद वाढ,सोडवण्यासाठी शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत श्री.शिकारे यांनी मांडले.
यापूर्वी शिकारे यांनी संघटनेत कार्यकरणीतील सदस्य म्हणून उत्कृष्ट काम पाहिले आहे. नुकतेच नवनिर्वाचित अध्यक्ष द.मा. ठुबे यांनी तीन वर्षासाठी शिकारे यांची नियुक्ती करण्यात आली .या बैठकीत नेवासा तालुका अध्यक्ष मुरलीधर देशमुख, सरचिटणीस श्री.पेचे,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी येळवंडे, बोरुडे,चंद्रकांत आघाव,मोहन लोखंडे, शिक्षण बँकेचे माजी संचालक मधुकर शिंदे,त्रिंबक सतरकर, जेष्ट शिक्षक भाऊसाहेब पोटे,बबन देशमुख, ढोकणे,राशीनकर,श्री.तुपे,प्रदीप महमीने,वच्छलाबाई लिपाने,भीमाबाई शिंदे, नर्मदा सोनसळे, शशिकला लांडे,विजया शेटे,पोपट घावटे, दत्तात्रय गुंजाळ, सर्जेराव कचरे,सातपुते, रामदास शेडगे, धोंडीराम सोनवणे,अनिल नाईक, कोल्हे, दळवी आदींनी निवडीचे स्वागत व अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button