गुणवत्तापूर्ण शिक्षणातुन आश्रमशाळा मुलांचा विकास साधावा..!
पांडुरंग इदे

अकोले- शासकीय आश्रम शाळा मुतखेल ता. अकोले जि. अहमदनगर येथे आज दि.15 जुन रोजी सकाळी 11.वा. प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून पालका जागृती करण्यात आली. शैक्षणिक जागृती फेरीत गावातील व पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. प्रवेशोत्सव जनजागृती फेरीनंतर झालेल्या नवगतांच्या स्वागत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आदिनाथ सुतार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग इदे व उपाध्यक्ष श्री बुधा पाटील व प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी श्री.आवारी साहेब व इतर सदस्य ऊपस्थित होते.
दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. तदनंतर नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात पांडुरंग इदे ऊपस्थितांना उदबोधित करताना म्हणाले की, विद्यार्थ्यी संख्या, दर्जेदार शिक्षण,आरोग्य यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. चार भिंतीतील शिक्षणाची जोड मुलांना सामाजिक जीवनात व समाजामध्ये स्वाभिमाना ने ऊभा करणारे शिक्षण यापुढील काळात मुलांना मिळावे. मुलांना काय हव आहे या गोष्टीचा विचार करून दरजेेॅदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण आश्रमशाळेतील मुलांना मिळावे, शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव व्हावा यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री इदे यांनी आपल्या प्रमुख भाषणात केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. आदिनाथ सुतार यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिक्षण म्हणजे केवळ विशिष्ट विषयाची माहिती प्राप्त करणे नाही.ते शिक्षणाच्या अनेक अंगापैकी एक अंग आहे.शिक्षणाच्या व्यापक विचारापासून आपले वर्तमानातील शिक्षणविचार सध्या हरवला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी कला, क्रीडा,संगीत,नृत्य नाट्य व खेळ या सर्वांगाने फुलणारा घडावा,मुले स्वतःच्या पायावर उभा राहावेत यासाठीचे प्रयत्न सशक्त होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री.सुतार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मगर सर,पंकज दुर्गुडे, बेळगे सर,ककडे मॅडम, प्रगती ढगे, झेंडे मॅडम ,साळवे मॅडम, जाधव सर ,बागुल सर,बाबासाहेब लोंढे सर व सर्व वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज दुुर्गुडे सर यांनी केले. तर शेेवटी आभार बाबासाहेब लोंढे यांनी मानले कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा व पालकांचा सहभाग उस्फूर्त होता.
