उठे तुफान काळजात” काव्यसंग्रहावर रविवारी शेवगावात परिसंवाद

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव येथील माध्यमिक शिक्षिका विद्या भडके यांच्या शब्दगंध प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ‘उठे तुफान काळजात’ या काव्यसंग्रहावर पद्मभूषण बाळासाहेब भारदे विद्यालयात सकाळी १०.३० वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.” अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषद,शेवगाव तालुका शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ नजन यांनी दिली.
पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात चे उद्घाटन महात्मा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.रमेश भारदे हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.शंकर चव्हाण हे असणार आहेत.या परिसंवादात प्रगतशील लेखक संघाच्या प्रदेश सहचिव शर्मिला गोसावी, अखिल भारतीय नाट्य परिषद,शाखा शेवगाव चे अध्यक्ष उमेश घेवरीकर व ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल सोनवणे हे सहभागी होणार आहेत.
यावेळी जेष्ठ रंगकर्मी सुभाष जाधव,बापूसाहेब गवळी,हरीश भारदे व सुनील गोसावी हे उपस्थित राहणार आहेत. तरी या आगळ्यावेगळ्या साहित्यिक कार्यक्रमास परिसरातील सर्व साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन अध्यक्ष हरिभाऊ नजन, कार्याध्यक्ष शहाराम आगळे,उपाध्यक्ष विजय हुसळे,सचिव सुरेश शेरे,राजेंद्र झरेकर,वैभव रोडी,अभिजित नजन यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे