इतर

अकोले मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी गोकुळ कानकाटे, शांताराम काळे कार्याध्यक्ष, अजय जाजू सरचिटणीस,


अकोले /प्रतिनिधी

-पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी गोकुळ कानकाटे, कार्याध्यक्षपदी शांताराम काळे,उपाध्यक्ष म्हणून प्रा.मच्छिन्द्र देशमुख व ज्ञानेश्वर खुळे तर सरचिटणीसपदी अजय जाजू यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.

मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक प्रकाश टाकळकर,उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य,सल्लागार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश आरोटे,कार्यकारिणी सदस्य राजेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.

परिषदेचे नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकरिणी सदस्य पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष -गोकुळ कानकाटे, कार्याध्यक्ष – शांताराम काळे, उपाध्यक्ष -प्रा.मच्छिन्द्र देशमुख,ज्ञानेश्वर खुळे, सरचिटणीस अजय जाजू, सह-सरचिटनिस -विनायक घाटकर, खजिनदार -विलास तुपे, संपर्क प्रमुख- नरेंद्र देशमुख
प्रसिद्धी प्रमुख- सतिश पाचपुते,
संघटक -अल्ताप शेख,सुनील गिते,,सचिन शेटे,स्वप्निल शहा,प्रा.चंद्रशेखर हासे
सल्लागार -विजयराव पोखरकर,शांताराम गजे,श्रीनिवास येलमामे,रामलाल हासे, कैलास शहा,डॉ सुनिल शिंदे, श्रीनिवास रेणूकदास,हेमंत आवारी,हेरंब कुलकर्णी, भाऊसाहेब वाकचौरे ,भाऊसाहेब चासकर, प्रकाश महाले,सागर शिंदे,अण्णासाहेब चौधरी
कार्यकारिणी सदस्य- रमेश खरबस, संजय महानोर,नितीन शहा,अनिल नाईकवाडी,राजेंद्र उकिरडे,प्रविण धुमाळ,आकाश देशमुख,संजय गायकर,जहिर शेख,दिनेश जोरवर, राजेंद्र मालुंजकर, संदीप देशमुख,अजय पवार,भाऊसाहेब साळवे,राजेंद्र भाग्यवंत, भाऊसाहेब कासार,विकास पवार.
अकोले तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी परिषदेचे तालुक्यात अधिकाधिक संघटन वाढीसाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी व्यक्त केली आहे.
नूतन पदाधिकारी व कार्यकारीणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे,प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले,नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य,दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके ,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button