डॉ. तनपुरे कारखाना सुरु करण्यासाठी मी तुमच्या बरोबर..!
आ निलेश लंके

चक्री उपोषणकर्त्यांना दिला पाठिंबा !
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
डॉ.तनपुरे कारखान्याच्या भ्रष्टाचाराबाबत जे चक्री उपोषण सुरू आहे।या उपोषणाला माझा पाठिंबा नाही तर मी तुमच्या बरोबर असून वेळप्रसंगी मी जिल्हा बॅकेसमोर मंडप टाकून उपोषणाला बसतो साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी मी चर्चा केली असल्याचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी बोलतांनी सांगितले आहे .
डॉ.तनपुरे कारखान्याच्या भ्रष्टाचारा बाबत राहुरी तहसील कार्यालयासमोर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या चक्री उपोषणाला आ. निलेश लंके यांनी भेट दिली असता ते बोलत होते.
पुढे आ. निलेश लंके म्हणाले की डॉ.तनपुरे कारखाना सुरू होण्यासाठी मी स्वतः तुमच्या बरोबर असणार आहे.
राहुरी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही . ते बाहेर असल्याने आ.तनपुरे आल्यावर त्यांच्याशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
डॉ. तनपुरे कारखाना हा राज्यामध्ये नावलौकिक मिळवलेला कारखाना होता. मात्र आज तनपुरे कारखान्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
किती भ्रष्टाचार झाला हे मला आता समजले आहे.सोन्याचा धुर निघणारा हा कारखाना पाहण्यासाठी राज्यातून शाळेतील मुलांच्या सहली येत होते मी पण सहलीच्या निमित्ताने कारखाना बघितला असून तनपुते कारखाना सुरू होण्यासाठी मी तुमच्या बरोबर असल्याचे आ लंके यांनी म्हंटले आहे.
यावेळी अमृत धुमाळ, राजुभाऊ शेटे, पंढरीनाथ पवार, बाळासाहेब जठार, दादासाहेब पवार यांनी
डॉ तनपुरे कारखान्यात कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला. शिक्षण संस्थेमधील ९ शिक्षकांच्या भरतीमध्ये कशा प्रकारे अर्थिक भ्रष्टाचार झाला.कारखाना सुरू करण्याची परवानगी न घेतल्याने १६ कोटीच्या पुढे दंड कसा झाला.
कारखाना परिसरात मुरुमाची कशा प्रकारे तस्करी झाली? जिल्हा बॅकेच्या ताब्यात असलेल्या कारखान्यात भंगार चोरी कोणी केली असे अनेक बाड उघड करण्यात आले.
यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, तहसीलदार फसियोद्दिन शेख पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
