इतर

शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता वाढविणे ,पदव्या प्राप्त करणे एवढेच नाही – प्रा. संदिप वाकचौरे

संगमनेर प्रतिनिधी

शिक्षण घेणे म्हणजे केवळ पदव्या प्राप्त करणे साक्षरता वाढविणे एवढेच नाही शिक्षणातून राष्ट्रासाठी सुजाण नागरिक व समाजासाठी एक चांगला माणूस घडविणे हे आहे असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ प्रा. संदीप वाकचौरे यांनी केले
नूतन कला महाविद्यालय राजापूर ता संगमनेर येथे दि.१३जानेवारी२०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान अंतर्गत राज्य प्राथमिक अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य प्रा.संदिप वाकचौरे
“विद्यार्थी-प्राध्यापक सहसंवाद” या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की शिक्षणाचे उद्दिष्ट हे केवळ साक्षरता वाढीस लावणे किंवा पदव्या प्राप्त करणे एवढेच नाही तर शिक्षणातून राष्ट्रासाठी सुजान नागरिक व समाजासाठी एक चांगला माणूस घडविणे हे आहे, त्या करिता विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी फक्त परीक्षा केंद्री न रहाता आपल्यामध्ये वाचन संस्कृती रुजविणे गरजेचे आहे, त्यातूनच महान माणसं आणि राष्ट्र उदयाला येत असतात हे अनेक दाखले देत त्यांनी स्पष्ट केले.

पुस्तक हातात येणाऱ्या माणसाला कोणापुढे नतमस्तक होण्याची गरज नाही.जे देश ज्ञानाला प्राधान्य देतात ते पुढे जातात. शिक्षक हा देशाचा निर्माता आहे.गांधींचे विचार देशासाठी महत्त्वाचे आहे. असे अनमोल विचार त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांपुढे व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ग.स. सोनवणे साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देताना असे म्हणाले की कर्तव्यनिष्ठा आणि वाचनाची आवड माणसांना जगभरात नावलौकीक प्राप्त करून देते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग सर यांनी शैक्षणिक समस्येवरील चर्चेतूनच विद्यार्थी आणि प्राध्यापकांमधील दुरावा कमी होवून सहसंवाद वाढीस लागेल, असे मत मांडले.
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार आणि परिचय वि.वि. मंडळाचे अधिकारी डॉ.प्रविण आहेर यांनी केला. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी.अनुजा घोलप हिने केले. तर कुमार अथर्व सोनवणे याने आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button