महसुल मंत्री विखे पाटील यांनी केले भांगरे कुटुंबियांचे सांत्वन .

भंडारदरा/ प्रतिनिधी
महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सोमवारी शेंडी (भंडारदरा) येथे भेट देत भांगरे कुटुंबियांचे सांत्वन केले .शुक्रवारी महसूल मंत्री विखे यांच्या धर्मपत्नी शालिनीताई विखे यांनी भांगरे कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेतली त्यानंतर आज महसूल मंत्री विखे यांनी भांगरे कुटुंबियांची भेट घेत धीर दिला
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा बँकेचे माजी संचालक व अगस्ती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जेष्ठ नेते अशोकराव भांगरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी निधन झाल्याने त्यांच्या अचानक निधनाने अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे भांगरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महसूल मंत्री विखे यांनी भेट घेतली विखे आणि भांगरे कुटुंबियांची कौटुंबिक स्नेहबंध असल्याने विखे यांनी आज त्यांचे कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांनी अशोकराव भांगरे यांच्या पत्नी सुनीता ताई भांगरे त्यांचे बंधू दिलीप भांगरे सुपुत्र अमितदादा भांगरे मातोश्री अंजनाबाई भांगरे उपस्थित होते

विखे पाटील यांचे समवेत आमदार डॉ किरण लहामटे .माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के,बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे , रावसाहेब वाळुंज , बाळासाहेब ताजणे , दिलीपराव मंड॔लिक , प्रकाशराव मालुजंकर , मंच्छिद्र धुमाळ , गोरक्ष मालुंजकर, महेशराव नवले , रावसाहेब वाळुंज, अरुण माळवे , बी आर चकोर , शिवाजी धुमाळ उपस्थित होते .
