अहमदनगर

वासुंदे येथील बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर यश


दत्ता ठुबे

पारनेर तालुका प्रतिनिधी


वासुंदे व परिसरात गेल्या सहा महिन्यापासून सलग बिबट्याचे दर्शन होत होते त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते . यासंदर्भात अॅंटी करपश्यन चे तालुका अध्यक्ष मनोज झावरे पाटील यांनी वन विभागाशी संपर्क साधून पिंजरा लावण्यासाठी निवेदन दिले होते. याचा पाठपुरावा करत वन अधिकारी नन्नवरे साहेब व सर्वच वनक्षेत्र कर्मचारी यांनी तातडीने निर्णय घेऊन पिंजरा बसवला व अवघ्या काही तासात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
यामध्ये नन्नवरे साहेब तसेच सर्व वनक्षेत्र कर्मचारी वर्ग व गावातील तरूण सहकारी मित्र , शिर्के वस्ती वरील सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले अशी माहीती अॅंटी करप्शन चे तालुकाध्यक्ष मनोज झावरे पाटील यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button