नेप्ती विद्यालयात रामदास फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण

अहमदनगर -नेप्ती तालुका नगर येथील श्री स्वामी अण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या नेप्ती विद्यालयात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशातील महात्मे व महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. नेप्ती विद्यालयात माजी विद्यार्थी तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सविता संजय जपकर ,श्रीराम मंदिरासमोर बाळासाहेब होळकर, श्री. संत सावता महाराज मंदिरासमोर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संतोष चौरे, जि.प.प्राथमिक शाळेत मेजर रवींद्र जपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झेंडा भोवती आकर्षण रांगोळी व फुलाचे सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त काढलेल्या प्रभात फेरीद्वारे व्यसनमुक्ती संदेश तसेच भारत मातेच्या जय घोषाने गावचा परिसर दणाणून निघाला. भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय,बंधुता या मूल्यावर आपला देश मार्गक्रमण करीत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा उपयोग नागरिकांनी करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत. सर्वांनी संविधानाचा आदर राखला पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले यांनी केले. संविधानाचे सामूहीक वाचन करून व्यसनमुक्तीची ग्रामस्थांनी सामाहिक शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन केले. यावेळी देशभक्तीपर गीते, झांज पथक ,देशभक्तीपर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले .विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची भाषणे झाली. मुख्याध्यापक महेश जाधव यांनी प्रास्ताविक करून प्रजासत्ताकाचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये खाऊचे वाटप करण्यात आले . ध्वजारोहणाचा मान दिल्याबद्दल रामदास फुले यांनी नेप्ती विद्यालयाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड .धर्मा जपकर,उपाध्यक्ष अर्जुन होळकर, दिलीपराव होळकर, नानासाहेब घोडके, सुरेश कार्ले, बाबासाहेब भोर, संतोष खरमाळे, बाबुलाल सय्यद, राजेंद्र झावरे, शिवाजी जाधव, राजेंद्र सांगळे, राधिका वामन, श्रध्दा भांड, अश्विनी पवार,सुनिता परभणे, माजी सरपंच विठ्ठल जपकर, सुधाकर कदम, उपसरपंच संजय जपकर, संजय अशोक जपकर, ग्रामसेवक लाल भाई शेख, तलाठी सोमनाथ गलांडे ,माजी उपसरपंच फारूक सय्यद, शिवाजी होळकर, जालिंदर शिंदे, भानाभाऊ फुले ,शाहूराजे होले ,बबन फुले, सबाजी कांडेकर ,बाळासाहेब बेल्हेकर, नानासाहेब बेल्हेकर ,बाबासाहेब बेल्हेकर ,पोलीस पाटील अरुण होले,ज्ञानेश्वर जपकर, दादू चौगुले, बंडू जपकर ,एकनाथ जपकर ,बाबासाहेब होळकर ,संभाजी गडाख, दत्तात्रय कदम ,लक्ष्मण कांडेकर,प्रा. शिवनाथ होले, गणेश फुले ,दिनेश फुले ,शिवव्याख्याते आकाश महाराज फुले ,दत्ता कळमकर, महादेव होळकर ,चंद्रकांत खरमाळे, गणेश कदम, व शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
