श्री क्षेत्र वासुंदे येथे संत श्री भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह !

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे संत श्री भाऊसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. 01/02/2023 ते 08/02/2023 या कालावधीत हा सप्ताह आयोजित करण्यात आले आहे.पहाटे काकडा भजन, नंतर ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ नंतर हरिकीर्तन, महाप्रसाद व शेवटी हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताह काळात पहिल्या दिवशी पारनेर तालुक्याचे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या पुण्य स्मरणानिमित्ताने हभप बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे किर्तन होणार आहे तसेच उंबरेकर महाराज, महामुनी महाराज, जगताप महाराज, सिनारे महाराज, उदावंत महाराज, भोजने महाराज,येवले महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे.

सप्ताह काळात चहापान व्यवस्था पत्रकार शरदराव झावरे यांचे कडून केली आहे. लाईट डेकोरेशन ची व्यवस्था श्री सुदाम हिंगडे अंजिरवाडी मुंबई यांचे कडून तर मंडप डेकोरेशन व्यवस्था श्री रामदासशेठ झावरे यांचे कडून करण्यात आली आहे .
काल्याचे किर्तन कृष्णकृपांकित हभप डॉ. विकासानंदजी महाराज मिसाळ यांचे होणार आहे.यानंतर आमटी भाकरी च्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अन्नदान व ज्ञान दानाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांनी केले आहे.
याच यात्रौत्सव काळात गुरुवार दि. 09/02/2023रोजी कुस्त्यांच्या जंगी हगाम्याचे आयोजन केले असल्याची माहिती सरपंच सौ सुमन सैद, उपसरपंच शंकरराव बर्वे तसेच ग्रा.प.सदस्य व वि.का.सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे ,पुणेकर मुंबईकर, औरंगाबादकर मित्रमंडळ तसेच सप्ताह समिती , वासुंदे यांनी दिली आहे.
.