इतर
महामानवाच्या जयंतीदिनी सुप्यात पाणपोईची सोय.

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांचे जयंतीदिनी सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांच्या संकल्पनेतून सुपे गावात पाणपोई सुरू करण्यात आली .
या प्रसंगी सेवानिवृत्ती पोलीस उपनिरिक्षक रावसाहेब भोसले, देवा मोटे, रमिझ शेख, अक्षय जवक, मोहित कोरेकर, वैभव काळे, राहुल थोरात, भाऊ निमसे, गौरव शिंदे, अभी येणारे, श्याम ढगे, शुभम मोकाते, दादा जवक, चैतन्य मगर, सौरभ अवचीते, लोकेश सूर्यवंशी, आतिफ शेख, किरण सूर्यवंशी, तुळशीराम जाधव, राम ढवळे, आदित्य ठोकळ, असिफ शेख, संतोष दळवी, किशोर सोंडकर, ओंकार ढवळे, दीपक शेळके, सार्थक काळे, मुन्ना शेख, आयन शेख, संदिप चव्हाण, आकाश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.