पारनेर शहरात संत रोहीदास महाराज जयंती उत्सवात साजरी !

आ.लंके यांच्या उपस्थितीत,बबनदादा चौरे यांच्या प्रवचन सेवेतुन संत रोहिदासांच्या धार्मिक कार्याला दिला उजाळा !
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्राची धार्मिक अस्मिता जतन करणाऱ्या पारनेर तालुक्यात जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य असणारे संत निळोबारायांसह अनेक साधुसंतांचा वारकऱ्यांचा तालुका म्हणून प्रचलित असणाऱ्या पारनेर तालुक्यात सर्वसाधारण संतांच्या जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात पार पडत असते . त्याच प्रमाणे पारनेर शहरामध्येही समस्त चर्मकार बांधवांतर्फे भव्य दिव्य संत रोहीदास महाराज जयंती उत्सव सोहळा पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समिती पारनेर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला .
संत रोहिदास महाराज जयंती सोहळ्यासाठी तालुक्यातून नव्हे तर जिल्हाभरातून चर्मकार समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली.या भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळ्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
पारनेर शहरांमध्ये संपन्न झालेल्या संत रोहीदास महाराज यांच्या जयंती उत्सवामध्ये आमदार निलेश लंके यांच्या समवेत पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजुभाऊ औटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनशेठ भालेकर ,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कावरे पारनेरचे माजी सरपंच बाळासाहेब नगरे, संजय वाघमारे, नगरसेवक श्रीकांत चौरे डॉक्टर सादिक राजे पारनेर शहराध्यक्ष बंडू गायकवाड, विजय डोळ, अमोल यादव, भाऊ निवडूंगे, बाळासाहेब लंके, संजय कानडे, विनायक कानडे , संतोष लोहकरे यांच्यासह पारनेर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील नावाजलेले मान्यवर व पारनेर शहरातील आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते .
सालाबाद प्रमाणे या ही वर्षी पारनेर शहरांमध्ये चर्मकार बांधवां तर्फे संत रोहीदास महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते .
निलेशजी लंके साहेब पारनेर नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष व नगरसेवकांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा़ पूजन करण्यात आले होते . त्यात पारनेर शहरातील संत परंपरेचे गाडे अभ्यासक तसेच अविनाश पारखपद समाजाचा गाडा अखंडित ठेवणारे आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचा वैचारिक वारसा अध्यात्माच्या रूपाने महाराष्ट्रभर पोचविणारे प.पु.स. बबनदादा चौरे यांनी संत रोहीदासांचे धार्मिक प्रभोधनपर विचार व त्यांचे चरित्र आपल्या प्रवचन सेवेतून सर्व उपस्थितांसमोर मांडले .
संत रोहीदास यांचे विचार आजच्या भरकटलेल्या तरुण पिढीला दिशादर्शक व स्फूर्तीदायक आहेत . आजकालच्या तरुण पिढीने संत रोहीदास यांचे विचार मनावरती बिंबवून स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे . रोहीदास महाराजांचे विचार समाजात जास्तीत जास्त पोहोचवण्याचं प्रयत्न आम्ही करू व येणाऱ्या काळामध्ये रोहीदास महाराज जयंती ही सरकारी दरबारी सुद्धा मोठ्या थाटामाटात होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे युवा नगरसेवक भूषण शेलार यांनी सांगीतले.
संत रोहीदास महाराज जयंती उत्सवामध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर संत रोहीदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते . या जयंती उत्सवासाठी साईनाथ मित्र मंडळ पद्मावती चौक पारनेर, पिंपळेश्वर मित्र मंडळ, पराशर मित्र मंडळ, व गणराज मित्र मंडळ यांची मोलाची साथ लाभली .हा जयंती उत्सव एकदम थाटामाटात साजरा होण्याची जबाबदारी लोहकरे, कानडे, पोटे, परदेशी, दळवी, शेळके, झरेकर, रोकडे, कदम, साळे, शेंडे, सातपुते, साळवे, बनगे, शेलार , गजरे परिवार व शहरातील सर्व समाज बांधवांच्या सहकार्यातुन आनंदमय वातावरणात पार पाडली.
पंधराव्या शतकातील महान क्रांतिकारक तत्कालीन समाजाला समानतेचा संदेश देणारे व जाती व्यवस्था नष्ट करून मानवाला एका सुत्रतेत बांधून ठेवणारे समता बंधुत्वाचा पुरस्कार प्रचार प्रसार करणारे संत रोहिदास महाराज यांचे विचार प्रेरणादायक आहेत व त्यांच्या विचारांवरच सध्याची समाज व्यवस्था योग्य रीतीने चालत आहे .
आ.निलेशजी लंके
सकल संत परंपरेतील जेष्ठ ऐक ईश्वरवादी , मानवता वादी, संसारातून परमार्थ सिध्द करणारे संत शिरोमणी रोहीदास महाराज यांचा संदेश आम्ही सर्व मानव एकाच ईश्वराची लेकरे आहोत.अज्ञान , अंधश्रद्धा , अस्पृश्यता दुर सारून शुद्ध आचरण ठेवावे.एक नीती,एक ईश्वर,एक भाव,एक आचार,एक प्रेम,एक विचार ठेवून मानवाने जगावे.तरच समाजात शांतता आणी समाधान नांदेल.अशा जगण्यानेच समाजात शांतता व समाधान नांदेल व अशा जगण्यानेच आम्हा मानवास संत रोहीदास महाराज समजतील.
प.पु.बबनदादा चौरे
संत रोहिदासांनी अंधश्रद्धा जातीप्रथा विषमता यांच्याविरुद्ध विचारांचे रणशिंग फुंकणारे परमपूज्य रोहीदास महाराज यांनी समाजाला एक वेगळी दिशा दिली . त्यांनी सांगितलेल्या विचारांच्या मार्गावरती आज नवीन सुधारित समाज पाहायला मिळतो त्यांचे विचार हे सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहेत .
विजय सदाशिव औटी
( नगराध्यक्ष नगरपंचायत पारनेर )
- चर्मकार समाजामध्ये जन्मलेल्या या असामान्य अतिविद्वान महान योगी परमज्ञांनी संत रोहीदास आपल्या विचारांवर समाज सुधारण्यासाठी चालू केलेली चळवळ ही संपूर्ण भारतामध्ये दिशा देणारी होती.संत रोहीदास महाराज यांचे ५६ देशांचे राजे अनुयायी होते.संत रोहीदास यांच्या विचारांचे स्मरण केले तर समाजकार्य व जगण्याला एक वेगळी ऊर्जा मिळते .
- अर्जुन भालेकर
- ( राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष )