अहमदनगर

तांभोळ सरपंचपदी भाजपाच्या सौ.जयश्री सुदिन माने

अकोले – प्रतिनिधी – 

अकोले तालुक्यातील तांभोळ येथे सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सदस्या सौ.जयश्री सुदिन माने यांची निवड झाली

सौ.माने यांचे माजी आमदार.वैभव पिचड यांनी पुष्पगुच्छ देऊन भाजपा कार्यालयात सत्कार  केला . यावेळी भाजपा कार्यकर्ते व तांभोळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तांभोळ येथील विद्यमान सरपंच सौ.अनुराधा चव्हाण यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज तांभोळ येथे सरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली. सरपंच पदासाठी सौ,जयश्री सुदिन माने व सौ.जयश्री जाधव ह्या आपले नशिब अजमावत होत्या. ग्रामपंचायतच्या 9 सदस्यापैकी 8 सदस्य उपस्थित होते. गुप्त मतदानामध्ये दोन्ही उमेदवरांना समान मते मिळाली.

त्यामुळे सोनल म्हस्के (इ. 1 ली) हिच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये सौ.जयश्री माने यांची वर्णी लागली. निवडणुक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी कुलकर्णी यांनी सौ.माने यांच्या नावाची घोषणा करताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. कुलकर्णी यांना निवडणुक कामी सहाय्यक म्हणून शिंदे तात्या व ग्रामसेवक जाधव यांनी काम पाहिले. 

त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच सौ.जयश्री माने यांचेसह कार्यकर्ते व तांभोळ ग्रामस्थ अकोले येथे भाजपा कार्यालयात आले. तेथे माजी आ.वैभवभाऊ पिचड यांनी सौ.माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी तांभोळ ग्रामपंचायत सदस्य सुदाम नवले, बाबासाहेब भांगरे, सुकदेव कडाळे, सखुबाई खोडके यांचेसह अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, वाल्मीक नवले, कु.हिंदवी माने आदी कार्यकर्त्यांसह तांभोळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button