…तर पारनेर पोलिसांच्या विरोधात उपोषणाचा इशारा

पोलिसांचे वागणे बरे नव्हे!
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे वागणे काही बरे नाही. तक्रारदारांना न्याय देण्यापेक्षा त्यांचा गुंता अधिक कसा वाढेल असा प्रयत्न करून आपले उखळ पांढरे करण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार पारनेर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध केली आहे
पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्मचारी यांचे ड्युटी रजिस्टर नक्कल व ड्युटी बटवडा तक्त्याची तपासणी करुन त्याचा
अहवाल तयार करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येत्या पंधरा दिवसात याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास पिडीत तक्रारदारांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पारनेर पोलीस निरीक्षक व त्यांचे काही सहकारी पोलीस कर्मचारी जाणीवपूर्वक पिडीत तक्रारदारास वेठीस धरून कुठलेही गुन्हे नोंद नसताना, जाणीवपूर्वक मारहाण करून अर्थपूर्ण संबंध तयार करत आहे. संबंधित पोलीसांविरोधात असलेल्या तक्रारीनुसार त्यांचे मोबाईल लोकेशन, मोबाईलची सीडीआर तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक यांचे ड्युटी रजिस्टर दैनंदिन नक्कलची तपासणी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तक्रारदारांना त्रास देणार्या पोलीस कर्मचार्यांची ड्युटी बटवडा तक्ता दैनंदिन नुसार 1 जानेवारी 2022 ते आजतागायत तपासणी करण्यात यावा व त्याचा अहवाल तयार करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.