पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेते पंजाबी बंधु व गाढे बंधु यांचा सन्मान!

अकोले प्रतिनिधी
पत्रकार दिनानिमित्त अकोले येथील वृत्तपत्र विक्रेते पंजाबी बंधु व गाढे बंधु यांचा महराष्ट्र राज्यमराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी नुकताच केला
40 वर्षांपासून वितरक म्हणून काम करत असताना ऊन-पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये प्रत्येक वाचकाच्या घरापर्यंत अंक देत असताना यामागे आपला किती फायदा किती तोटा हे न पाहता सकाळी चहा बरोबर लोकांना वर्तमानपत्र पाहिजे. तसेच धावत्या युगातही सर्व वाचकांना वृत्तपत्राची सवय टिकून आहे. ही सवय असल्यामुळे त्यांच्या घरोघरी जाऊन हे वृत्तपत्र देत असताना त्यांच्या चेहर्यावरील आनंद हाच आमचा नफा म्हणून आम्ही चाळीस वर्ष या व्यवसायात आहोत. मात्र सोशल मीडियामुळे वितरणात मोठी हानी झाली तर दोन वर्षांपासून कोरोणा सारख्या भयानक आजारामुळे वाचक अंक घेण्यापासून थांबले मात्र ही घडी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पुन्हा एकदा वाचक अंक घेण्यासाठी येऊ लागले. आज पुन्हा एकदा तिसर्या लाटेची चर्चा होत असताना वृत्तपत्र व्यवसायावर मोठी गदा येऊन पाहत आहे. या चळवळीत लाखो लोकांचे उदरनिर्वाह चालतात या चळवळीला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे.सरकारने देखील हा लघु उद्योग यामध्ये समावेश करावा कोरोणा काळामध्ये अनेक वृत्तपत्र व्यवसाय मध्ये काम करणार्या अधिकारी-कर्मचारी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया वितरक यांची मोठी हानी झाली शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
आता तरी शासनाने या वृत्तपत्र व्यवसायाला आधार देणे ही काळाची गरज आहे यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन याचा विचार केला पाहिजे असे मत अकोले तालुक्यातील 40 वर्षांपासून वितरक म्हणून काम करत असलेले तिलक पंजाबी अशोक पंजाबी बबलू पंजाबी व 20 वर्षांपासून वितरणाचे काम करत असलेले नारायण गाडे व शिवाजी गाडे या परिवाराचा काल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने काल त्यांचा पुणेरी पगडी शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन पत्रकार संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे होते. यावेळी तिलक पंजाबी यांनी बोलताना सांगितले की 1981 साली आम्ही दैनिक प्रभात या वृत्तपत्राची एजन्सी घेतली ही एजन्सी मिळवून देत असताना ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक यांचा मोठा सहभाग राहिला पहिल्यापासून परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे या व्यवसायात उतरत असताना जिद्द व चिकाटी ही मनी धरली माझा लहाना भाऊ अशोक पंजाबी हा पत्रकार भाऊसाहेब मंडलिक यांच्याकडे कार्यालयात काम करत असे.उद्या येणारी वर्तमानपत्रातली बातमी आजच सोशल मीडियात प्रत्येकाच्या मोबाईलवर येऊ लागल्याने वर्तमानपत्रावर त्याचा परिणाम होत असला तरी अनेकांचा या वर्तमानपत्रावर अजूनही विश्वास आहे. वर्तमानपत्रातील संपादकीय लेख त्याचबरोबर ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींवर वाचकांचा मोठा विश्वास आहे या वाचकांच्या लोकप्रियतेवर अजूनही अनेक दैनिक टिकून आहेत. सोशल मीडियामुळे प्रत्येक वर्तमानपत्र वेबसाईटवर दिसू लागल्या मध्ये वाचक आता वर्तमानपत्र विकत घेवून वाचण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त पसंती देत आहे आठ हजार अंकांची विक्री आज मात्र निम्म्यावर येऊन ठेपली आहे.ग्रामीण भागातील वाचकांना व शहरी भागातील वाचकांना जे अशक्य आहे ते देण्याचे काम अनेक दैनिक करत आहेत त्या दैनिकांमध्ये जनतेला काय अपेक्षित आहे ते देत असल्यामुळे आजही वाचक वर्गाची लोकप्रियता टिकून आहे पुढील काळात प्रत्येक दैनिकाने आपला एक वाचक वर्ग निर्माण करून ठेवणे ही काळाची गरज आहे आजही लोकांना वेगवेगळे दैनिक वाचल्याशिवाय शांत बसवत नाही प्रत्येकाच्या घरापर्यंत दोन रुपयांमध्ये मिळणारे फक्त वर्तमानपत्र आज शिल्लक आहे. कोणतेही अंकाची किंमत ही आठ रुपये किमतीपेक्षा जादा नाही आजच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर तिची किंमत किती आहे आणि वर्तमानपत्र सोळा पाणी देत असताना त्याचा खर्च किती याचा देखील विचार करावा लागतो. वर्तमानपत्र चालविणे ही मोठी साखळी आहे. या साखळीला जिवंत ठेवण्यासाठी जनतेने देखील मदत करणे ही काळाची गरज आहे प्रत्येक वर्तमानपत्राचा आत्माही त्याची जाहिरात आहे.वर्तमानपत्र चालविणे ही प्रत्येक मालक संपादक व्यवस्थापक व आता पत्रकार यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे वितरण देखील या मधील महत्त्वाचा घटक आहे.या सर्व घटकांना बरोबर घेऊन पुढे गेलो तरच वर्तमानपत्रे टिकू शकतात सोशल मीडियामुळे वर्तमानपत्राला कोणताही धोका नाही थोडा टीआरपी कमी पडेल मात्र दैनिक टिकुन राहतील असा विश्वास व्यक्त केला नगर जिल्ह्यातील भांड बंधु यांचा जिल्ह्यात वितरक म्हणुन चांगले काम आहे त्यांचा देखील काल सन्मान करण्यात आला होता.