जि.प.प्राथ.शाळा पळशी येथे विद्यार्थ्याना वह्या वितरण सामाजिक

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
हिंदुस्थान कंपनीचे विक्रेते कटारिया पोपटलाल, चव्हाण अशोक, साईनाथ डेअरी, मलवीर डेअरी पळशी याच्या मागणीवरून पारनेर तालुक्यातील पळशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना हिंदुस्थान फीड्स कंपनी बारामती, सातारा, श्रीरामपूर, व राजस्थान कंपनी कडून c.s.r योजनेअंतर्गत मोफत वह्या चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित कंपनी अधिकारी श्री.विलास गायकवाड साहेब, डेअरी चेअरमन श्री.दत्तात्रय जाधव व श्री.संतोष मोढवे, सरपंच श्री.प्रकाशजी राठोड, उपरंपच श्री.आगीवले, श्री.नंदू साळवे,श्री.रवी शिंदे,श्री.नितीन जाधव,श्री.अमोल जाधव,
श्री.अंबरनाथ वाळुंज,श्री.अजित मोढवे,श्री.गुलाब भुतांबरे,
श्री.लक्ष्मण ठाणगे, मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब डहाळे व शिक्षक या सर्वांच्या उपस्थितीत एकूण 90 विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले.यापुढील काळातही असे विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.श्रीम.मीनाताई वाघ यांनी सर्वांचे आभार मानले.