इतर

प्रशासनाचे मध्यस्तीने शरद पवार- गो बॅक ” आंदोलन स्थगित … पवार पारनेर दौऱ्यावर!

शिष्टमंडळाला पवारांच्या भेटीची वेळ !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  हे उद्या शुक्रवारी (१० मार्च) पारनेरच्या दौऱ्यावर येणार आहेत. निघोज येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा व विविध कार्यक्रम पार पडणार आहेत .

मात्र या दौऱ्याला पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने विरोध दर्शवला होता. समितीकडून कारखान्याच्या विक्रीत पवारांचा हात असल्याचा आरोप केला होता . कारखाना बचाव समितीकडून ‘शरद पवार-गो बॅक’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर रात्री जवळे ते देवीभोयरे रस्त्यावर ‘शरद पवार-गो बॅक’ असे लिहुन आपली नाराजी व्यक्त केली होती . या आंदोलनाला भुमिपुत्र शेतकरी संघटना , भीम आर्मी , अन्याय निर्मुलन समिती , भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश भैरवनाथ ग्रामविकास मंडळ या सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला होता . सामाजिक संघटनांच्या पाठींब्यामुळे आंदोलनाची धार बळकट होत असल्याचे दिसुन येताच प्रशासनाने आयोजक व आंदोलकांत मध्यस्थी करण्याची भुमिका घेतली .


पवारांची याच कार्यक्रमात भेटीची वेळ द्यावी अशी आंदोलकांची मागणी होती . राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी आंदोलकांची तीव्र भावना पवारांपर्यंत पोहचवण्याची हमी घेत , त्यांची भेट घालून देण्याचे समितीला आश्वासन दिले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कार्यक्रमाचे आयोजक व आंदोलक यांच्यात मध्यस्थी केल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा कारखाना बचाव समितीने केली आहे . आंदोलनाला पाठींबा दिलेले कार्यकर्ते कारखाना सभासद, शेतकरी, कामगार, भुमिपुत्र शेतकरी संघटना, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश मोर्चा, अन्याय निवारण व निर्मुलन समिती, भैरवनाथ ग्रामविकास ट्रस्ट यांचे आभार बचाव समितीने व्यक्त केले आहेत .

आंदोलन स्थगित झाल्याची माहिती पारनेर समितीचे अध्यक्ष रामदास घावटे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, बबन कवाद, साहेबराव मोरे , भानुदास साळवे , भाऊसाहेब खेडेकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button