इतर

विरोलीच्या सरपंच सौ.प्रभाती मोरे नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित!

दत्ता ठुबे

                     

 पारनेर प्रतिनिधी-

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वराज्य सरपंच सेवा संघ, यांच्या वतीने सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांच्या हस्ते विरोली गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. प्रभाती शंकर मोरे यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.

                      माऊली सभागृह, नगर येथे हा संस्मरणीय सोहळा पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये ह्या होत्या. स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक  यादवराव पावसे पाटील, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष  बाबासाहेब पावसे पाटील, राज्यभरातून आलेले आदर्श सरपंच, डॉक्टर,शिक्षक,युवा,समाजसेवा या सर्वांचा महिला तसेच पुरुषांचा सन्मान केला गेला सर्वप्रथम सर्वांना फेटे बांधण्यात आले.संस्मरणीय सोहळा पार पडला. या पुरस्काराने गावासाठी खूप तसेच इतर घटकांची सेवा करण्याची दुप्पट ऊर्जा मिळाली.

   विरोलीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच  प्रभाती मोरे यांनी गावासाठी अथक प्रयत्न करून घरकुले, गावासाठी ६ कोटी रुपयांचे रस्ते, महिला बचत गट, ‘क’ वर्ग देवस्थानासाठी जिल्हा परिषदेकडून १ कोटी, आमदार,खासदार,जि.प. सदस्य,पंचायत समिती सदस्य, राज्याचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून गावाचा कायापालट केला आहे.सरपंच मोरे यांना याआधीही तीन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

                     सरपंच सौ. मोरे यांच्यावर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.नगर दक्षिणचे खा डॉ.सुजयदादा विखे पाटील,महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष श्री.विजयराव औटी ,पारनेरचे आमदार निलेश लंके  यांनी सरपंच मोरे यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button