
अहमदनगर प्रतिनिधी :
अहमदनगर-शहरातील सक्कर चौक येथे दि.२० मार्च रोजी रात्री १०.१५ वाजेच्या दरम्यान एका तरुणास चारचाकी वाहनातून आलेल्या इसमांनी शिवीगाळ करून दमदाटी करून निघून गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
दमदाटी केलेल्या युवकाचे नाव संकेत सूर्यकांत जाधव असे आहे.हा युवक मल्हार चौक रेल्वेटेशन येथील रहिवाशी असून रात्रीच्या सुमारास झालेल्या या प्रकरणाने प्रचंड भयभीत झालेल्या या तरुणाने लागलीच कोतवाली पोलीस स्टेशन गाठून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये भादविक ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक रवींद्र टकले हे करत आहेत.