वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून रुग्णांना ५१ हजाराची मदत !

सोनई प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा बँकेचे चेअरमन रेवणनाथ मिठू निमसे यांनी वाढदिवसाचा खर्च न करता ५१ हजाराची मदत गरीब रुग्णांच्या उपचारासाठी दिली
श्री रेवणनाथ निमसे यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्च टाळून गरीब रुग्णांना आर्थिक हातभार लागावा म्हणून निमसे यांनी ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५१ हजाराची मदत डॉ. संदीप लिपाने यांच्याकडे सोपविण्यात आली.
आयुष्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास किती अडचणीला सामोरे जावे लागते,ही जाणीव लक्षात मी माझ्या परीने शक्य होईल ती रुग्णासाठी मदतीचा हात पुढे राहणार असल्याचे मत चेअरमन निमसे यांनी बोलताना सांगितले.
साहित्यिक नेते यशवंतराव गडाख व मंत्री शंकरराव गडाख यांच्या विचारधारेतून निमसे यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ गरजू रुग्णांना हा आर्थिक मदतीचा हात एक कौतुकास्पद आहे.
—-.राजेंद्र बोरुडे–
माजी सरपंच, सोनई.
या वेळी कामगार संघटना नेते डी. एम.निमसे,डॉ.महेश वरपे, पत्रकार विजय खंडागळे, पत्रकार विनायक दरदले,मानव विकास परिषदचे जिल्हा अध्यक्ष आप्पा साहेब निमसे,ग्रामपंचायतीचे सदस्य सखाराम राशीनकर,रोहिदास कोठुळे, सुनील बेल्हेकर, राजू पांगारकर,आदी उपस्थित होते.